शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसावर तलवार, चाकूने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 21:47 IST

दारव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत पोलीस शिपायावर बुधवारी रात्री येथील शंकर टॉकीज चौकात नऊ जणांनी तलवार, चाकू व रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. यात पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून आठ जण पसार झाले आहे.

ठळक मुद्देदिग्रसची घटना : एकास अटक, आठ पसार

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : दारव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत पोलीस शिपायावर बुधवारी रात्री येथील शंकर टॉकीज चौकात नऊ जणांनी तलवार, चाकू व रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. यात पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून आठ जण पसार झाले आहे.श्रावण शालिकराम राऊत असे जखमी पोलीस शिपायाचे नाव आहे. दिग्रस येथील मूळ रहिवासी असलेले राऊत बुधवारी रात्री शंकर टॉकीज चौकातून जात होते. त्यावेळी नऊ जणांनी राऊत यांना कोणतेही कारण नसताना अडविले. अश्लील शिवीगाळ केली. एवढेच नाही तर चाकू, तलवार आणि रॉडने हल्ला केला. यावेळी परिसरात असलेल्या नागरिकांनी धावून जाऊन राऊत यांची या हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका केली. या हल्ल्यात त्यांच्या हात, पाय, मानेला व डोळ्याला जबर दुखापत झाली. या घटनेची तक्रार दिग्रस पोलीस ठाण्यात देण्यात आली.त्यात शे.मोसीन उर्फ गुड्डू, शे.मुज्जफर शे. हरुन, शे.अकबर शे. हरुन, शे.लाला शे. बब्बू, शे.मुन्ना शे. रफिक, शे.पीटर शे. हरुन, शे.राजिक शे. रशीद आणि शे. फैजान शे. रहीम सर्व रा. चमनपुरा यांची नावे नमूद केली आहे. ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे यांनी तपास सुरू केला. दरम्यान हल्लेखोरातील शे.अकबर शे. हसन याला अटक करण्यात आली. पोलिसांवरच हल्ला होत असेल तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न या घटनेने निर्माण झाला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा