शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी मृतदेह पाठविला शवचिकित्सागृहात

By सुरेंद्र राऊत | Updated: February 15, 2024 20:13 IST

जामनकरनगरातील प्रकार : महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याची पोलिसांकडे तक्रार

सुरेंद्र राऊत, यवतमाळ : शहरातील जामनकरनगर येथे एका २८ वर्ष महिलेचा मृत्यू झाला. याची माहिती पतीने नातेवाईक व शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर महिलेच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. गुरुवारी दुपारी २.३० वाजता अंत्ययात्रा निघाली. तितक्यात अवधूतवाडी पोलिस तेथे पोहोचले व त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेवून शवचिकित्सागृहात शवचिकित्सेकरिता पाठविला. या घटनेने अंत्ययात्रेत आलेल्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली. 

दीपाली ऊर्फ नंदनी महेश मिश्रा (२८) रा. जामनकरनगर यवतमाळ असे मृत महिलेचे नाव आहे. दीपालीचा गुरुवारी झोपेतच मृत्यू झाला, अशी माहिती तिचा पती महेश जनार्दन मिश्रा (३४) याने शेजारी व नातेवाईकांना दिली. त्यानंतर शेजारी, नातेवाईक यांनी दीपालीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. दरम्यान हा प्रकार संशयास्पद वाटल्याने एका नागरिकाने 'डायल ११२' या क्रमांकावर संपर्क केला व महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याबाबतची शंका व्यक्त केली. त्यावरून अवधूतवाडी पोलिसांचे पथक महेश मिश्रा याच्या घरी गुरुवारी दुपारी २.३० वाजता पोहोचले.

पोलिसांना तेथे कोणीच आढळून आले नाही. अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाल्याची माहिती मिळाली, पोलिसांनी स्मशानभूमीत जाणारी अंत्ययात्रा रस्त्यातच थांबवून  दीपालीचा मृतदेह ताब्यात घेतला. दीपालीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास करण्यासाठी तिचा मृतदेह शवचिकित्सागृहात ठेवला आहे. तूर्त या प्रकरणात अवधूतवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून दीपालीचा पती महेश मिश्रा याची पोलिसांकडून चाैकशी केली जात आहे.

दीपालीच्या मृत्यूचे खरे कारण शवचिकित्सा अहवालानंतरच पुढे येईल, असे अवधूतवाडी ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांनी 'लोकमत'ला सांगितले. दीपाली व महेशला पाच वर्ष आठ वर्षाची दोन मुले आहेत. नेमका काय प्रकार घडला याचा शोध घेतला जात आहे. दीपालीच्या मृत्यूबाबत आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. पोलिसांकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. शवचिकित्सा अहवालानंतर पोलिस याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.

दीपालीला आईवडील नाही

दीपाली महेश मिश्रा हिला पती, दोन मुलं यांच्या व्यतिरिक्त जवळच नातेवाईक नाही, दीपाली आईवडील, भाऊ, बहीण असे जवळचे नातेवाईक नसल्याचे पोलिस चौकशीत पुढे आले आहे, त्यामुळे घातपाताचा संशय आणखी बळावला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी