शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची सुटीसाठी ओरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 05:00 IST

यवतमाळ जिल्ह्याचा भाैगोलिक विस्तार लक्षात घेता १०० ते १५० किलोमीटर अंतरावरील पोलीस कर्मचारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन आपली तक्रार व्यक्तीश: मांडू शकत नाही. त्याबाबत तो पाठपुरावाही करू शकत नाही. पोलीस दलातील मनुष्यबळ कमी असल्याने कार्यालयीन कामकाजासाठीसुद्धा त्यांना आवश्यक सुटी मिळणे शक्य नाही. अशा स्थितीत कर्मचारी समाधान कक्षाच्या माध्यमातून आपल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात.

ठळक मुद्देसमाधान कक्षात निराकरण : वर्षभरात प्राप्त ४८ तक्रारी निकालात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलीस दलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशाविरुद्ध जाता येत नाही. या बाबीचा बऱ्याचदा जाचक पद्धतीने वापर होऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या स्थानिक वरिष्ठांकडून न सोडविल्या जाणाऱ्या समस्यांसाठी जिल्हा प्रमुखांकडे दाद मागण्याची सोय करण्यात आली आहे. समाधान कक्षाच्या माध्यमातून कर्मचारी आपली गाऱ्हाणी वरिष्ठांकडे मांडतात. यामध्ये सर्वाधिक तक्रारी या स्थानिक वरिष्ठांकडून रजा मिळत नसल्याच्या आहेत. यवतमाळ जिल्ह्याचा भाैगोलिक विस्तार लक्षात घेता १०० ते १५० किलोमीटर अंतरावरील पोलीस कर्मचारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन आपली तक्रार व्यक्तीश: मांडू शकत नाही. त्याबाबत तो पाठपुरावाही करू शकत नाही. पोलीस दलातील मनुष्यबळ कमी असल्याने कार्यालयीन कामकाजासाठीसुद्धा त्यांना आवश्यक सुटी मिळणे शक्य नाही. अशा स्थितीत कर्मचारी समाधान कक्षाच्या माध्यमातून आपल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. समाधान कक्षात प्राप्त तक्रार तातडीने सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. तक्रार मिळाल्यानंतर तिचे स्वरूप काय, कुठल्या विभागाशी, आस्थापनेशी निगडित आहे, हे पाहून संबंधित लिपिकाकडे ती तक्रार दिली जाते. लिपिकांनी पूरक अभिप्राय दिल्यानंतर ती तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांपुढे ठेवण्यात येते. त्या तक्रारीवर अधीक्षकांकडून योग्य कारवाईसाठी निर्देश दिले जातात. यामुळे प्रत्यक्ष तक्रारदाराला स्वत: हजर न राहता आपल्या तक्रारीचे निराकरण करून घेता येते. रजा, वेतन तफावतीसोबतच कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवापुस्तिकेविषयक तक्रारी मांडून त्यात दुरुस्ती करून घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी समाधान कक्ष हा योग्य माध्यम आहे.

४८ तक्रारींचे निवारणसमाधान कक्षात तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची तत्काळ दखल घेतली जाते. संबंधित लिपिकाच्या माध्यमातून ही माहिती वरिष्ठांकडे पोहोचविण्यात येते.वर्षभरात ४८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. प्राप्त तक्रारींवर अधिकाऱ्यांकडे कुठली कार्यवाही केली याचा अहवाल संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून तत्काळ दिला जातो.

ना कोणाला रजा,  ना कोणाला पदोन्नतीसमाधान कक्षामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या सर्वाधिक तक्रारी रजा मिळत नसल्याच्या येतात. अत्यावश्यक कारण असूनही वरिष्ठांनी रजा नाकारली. वेतनाची तफावत दूर झालेली नाही. जीपीएफमधून पैसे मिळण्याचा प्रस्ताव सादर केला. मात्र, त्याला मंजूरी मिळालेली नाही. त्यासाठी विलंब होतो. अशा स्वरूपाच्या तक्रारी समाधान कक्षात येत असतात.

 

टॅग्स :Policeपोलिस