शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ शहरातील मटका अड्ड्यांवर पोलिसांचे धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 05:00 IST

शहरातील आठवडी बाजार, अप्सरा टॉकीज चौक, सिव्हिल लाईन, शासकीय रुग्णालय परिसर, वडगाव, मुलकी, उमरसरा, जामनकरनगर, भोसा यासह इतरही भागांत अवैध दारू विक्री व मटका सुरू आहे. हा व्यवसाय पूर्णत: कधीच बंद झालेला नाही. पोलीस कारवाई केल्यानंतर काही दिवस तो बंद ठेवून नंतर छुप्या पद्धतीने चालविला जातो. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी कुठलाही अवैध धंदा चालणार नाही, असे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यात सर्वच ठिकाणी धंदे सुरळीत सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील सर्वच अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अस्तित्व दाखविण्यासाठी या अवैध धंद्यांवर धाडसत्र राबविले. जवळपास चार ठिकाणी धाडी घालून मटका अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशावरून धाडसत्र राबविण्यात आले. त्यासाठी पोलीस पथकांची अदलाबदल करण्यात आली. शहरातील आठवडी बाजार, अप्सरा टॉकीज चौक, सिव्हिल लाईन, शासकीय रुग्णालय परिसर, वडगाव, मुलकी, उमरसरा, जामनकरनगर, भोसा यासह इतरही भागांत अवैध दारू विक्री व मटका सुरू आहे. हा व्यवसाय पूर्णत: कधीच बंद झालेला नाही. पोलीस कारवाई केल्यानंतर काही दिवस तो बंद ठेवून नंतर छुप्या पद्धतीने चालविला जातो. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी कुठलाही अवैध धंदा चालणार नाही, असे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यात सर्वच ठिकाणी धंदे सुरळीत सुरू आहेत. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ३ जानेवारीपासून धाडसत्र सुरू केले. अवधुतवाडीच्या हद्दीतील ऑनलाईन लॉटरी जुगारावर व नंतर शारदा चौकातील मटका अड्ड्यावर धाड टाकली. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोडमोहा, तळेगाव, खाणगाव येथेही धाडी घालण्यात आल्या. महागाव तालुक्यातील मटका अड्ड्यांवरही स्थानिक गुन्हे शाखेने धाड घातली आहे. स्थानिक गुन्हे शाखा सक्रिय झाल्यानंतर यवतमाळ शहरात उपविभागीय अधिकारी संपतराव भोसले यांच्याकडून सुद्धा मोहीम हाती घेण्यात आली. शनिवारी अवधुतवाडीतील पोलीस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार यांनी पथकासह अप्सरा टॉकीज चौकातील मटका अड्ड्यावर धाड घातली. तेथून २८ हजारांचा मुद्देमाल ज्यात मोबाइल व काही रोख रक्कम समाविष्ट आहे. यासह दहा जणांना अटक करण्यात आली. त्याचवेळी अवधुतवाडी व शहर पोलिसांच्या पथकाने शारदा चौकातील मटका अड्ड्यावर धाड टाकली. त्याठिकाणी विशेष काही पोलिसांच्या हाती लागले नाही. नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध पुन्हा धाडसत्र सुरू केले आहे. याचा प्रभाव किती दिवस कायम राहतो, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष आहे. 

रस्त्यावरचे धंदे बंद करण्याचे आव्हान- अनेक वर्षांपासून रस्त्यावर चालणारे अवैध धंदे बंद करण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे. याशिवाय मोठमोठ्या उलाढाली होणारेही अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यांना रेकाॅर्डवर आणून कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. शहरातील अवैध धंदे, विशेष करून अवैध दारू विक्री, गांजाची विक्री राजरोसपणे सुरू आहे. दारू व गांजाच्या सेवनातूनच गुन्हे घडत आहेत. बालगुन्हेगारांची संख्या वाढत आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस