शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वसाहत की पोड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:26 IST

जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या पळसवाडी कॅम्पमधील पोलीस वसाहतीला जंगलाचे स्वरूप आले आहे. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. डासांचा उद्रेक वाढला आहे. वराह आणि मोकाट जनावरांचा कळप या भागात धुडगूस घालत आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांचेही दुर्लक्ष : प्रचंड दुर्गंधी आणि वराहांमुळे डेंग्यूची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या पळसवाडी कॅम्पमधील पोलीस वसाहतीला जंगलाचे स्वरूप आले आहे. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. डासांचा उद्रेक वाढला आहे. वराह आणि मोकाट जनावरांचा कळप या भागात धुडगूस घालत आहे. नगरपरिषद प्रशासनालाही लक्ष देण्यास उसंत नाही. यामुळे हा संपूर्ण परिसर एखाद्या मागास पोडासारखा दिसत आहे. पोलीस कुटुंब वसाहतीमधून काढता पाय घेण्याच्या वाटेवर आहेत.पळसवाडी कॅम्प हा परिसर पोलीस वसाहत म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पोलिसांचे कुटुंब वास्तव्याला आहेत. तरी या वसाहतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. परिसरात काटेरी वृक्ष, काचकोऱ्या, झिंगुरड्याची झाडे, अंगाला चिकटणारे काटे पसरले आहेत. या वेढ्याने विद्युत डीपीलाही घेरले आहे. यामुळे वीज गुल होण्याचा प्रश्न मोठा झाला आहे. या भागात वारंवार वीज ‘ट्रिप’ होत आहे.या भागातील नाल्या आणि ‘शोकपिट’ बेवारस आहे. यातून प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे, नाल्या आणि शोकपिट डासांच्या उद्रेकाचे केंद्र बनले आहे. यवमाळ शहरात डेंग्यूची साथ पसरली असताना नगरपरिषदेने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे. या भागाचे नगरसेवक जगदीश वाधवानी यांचे या परिसराकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले. पोलीस आणि कुटुंबीयांनी या वसाहतीच्या प्रश्नावर नगरसेवकाकडे वारंवार तक्रारी नोंदविल्या. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. यामुळे संपूर्ण परिसराला जंगलाचे स्वरूप आले आहे. या भयावह स्थितीने पोलीस कुटुंबांमध्ये दहशत पसरली आहे. डेंग्यूच्या उदे्रकावर कशी मात करावी, असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. समाजाला संरक्षण पुरविणाऱ्या पोलिसांना आपल्या कुटुंबीयांसाठीही संघर्ष करावा लागत आहे.आम्हाला वाळीत टाक ले काय?कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी लढतात. पण त्यांच्या कुटुंबीयांना नगरपरिषदेने वाळीत टाकले काय, असा प्रश्न या वसाहतीमधील नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. भर उन्हाळ्यातील पाणीटंचाईतही या भागाकडे असेच दुर्लक्ष झाल्याची खंत त्यांनी नोंदविली.पोलिसदादापुढे दुहेरी संकटगावगुंडांपासून सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांच्या वसाहतीकडे नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे गावगुंडांशी झुंजताना अनारोग्य आणि साथीच्या आजाराशीही झुंजण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. यातून पोलीस कुटुंबांमध्ये नगरपरिषदेप्रती रोष व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Policeपोलिस