शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनो, ‘सीआयडी’च्या सूचना पाळा; महासंचालकांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 14:56 IST

कोठडीतील मृत्यू टाळण्यासाठी ‘सीआयडी’कडून (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) तपासाबाबत वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आदेश महासंचालकांनी जारी केले आहे.

ठळक मुद्देसांगलीतील कोठडी मृत्यूनंतर तपास अधिकाऱ्यांसाठी ‘अलर्ट’ जारी

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : कोठडीतील मृत्यू टाळण्यासाठी ‘सीआयडी’कडून (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) तपासाबाबत वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आदेश महासंचालकांनी जारी केले आहे. सांगलीतील घटनेनंतर राज्यभरातील तमाम पोलीस अधिकाऱ्यांना सावधगिरीचा इशारा देताना तपासाची मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे.राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात कुमार यांनी राज्यातील पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांना कोठडीतील मृत्यूबाबत खास पत्र लिहून अलर्ट केले आहे. गुन्ह्यांचा तपास कसा करावा, काय दक्षता घ्यावी, याबाबत सीआयडी व महासंचालक कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना दिल्या गेल्या आहेत. त्याचे काटेकोर पालन करण्याचे आदेश आहेत.पोलीस तपास अधिकाऱ्याने चौकशीचे तंत्र अवगत करावे, स्वत:चे कौशल्य वापरावे, आरोपीस मारहाण करू नये, त्याचा शारीरिक-मानसिक छळ करू नये, तपासी अधिकाºयाने अत्याधुनिक शास्त्रीय व तंत्रज्ञानाचा तसेच लाय डिटेक्टर, पॉलीग्राफ, ब्रेन मॅपिंग, नार्को या सारख्या चाचण्यांचा वापर करावा, फॉरेन्सींक सायन्स तंत्राची मदत घ्यावी आदी सूचना देण्यात आल्या आहेत. तपासी अंमलदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचनाही घटकप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.निनावी तक्रारींचीही दखल घ्यानिनावी तक्रारीची दखल घेऊ नये, असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. परंतू, पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दती, वर्तवणूकीबाबत काही तक्रारी असतील, एवढेच नव्हे तर निनावी तक्रारी असतील तरी त्याची तातडीने दखल घ्यावी, त्याची चौकशी करून योग्य ती खातरजमा करावी, असे निर्देश आहेत.पोलीस दलातून वेगळाच सूरसांगलीतील घटनेच्या निमीत्ताने पोलिसांच्या कार्यपध्दतीबाबत सर्वत्र जनतेतून तीव्र रोष व्यक्त केला जात असताना पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांमधून मात्र वेगळाच सूर आळवला जात आहे. थर्ड डिग्री अथवा कोणतीही मारहाण न करता, आरोपीचा आदर सत्कार-मानसन्मान केल्यास तो गुन्ह्याची कबुली देईल काय, या पध्दतीने गुन्हा डिटेक्ट हाईल काय? त्यासाठी काही वेगळे तंत्र आहे का? आदी सवाल उपस्थित केले जात आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना डिटेक्शन हवे असते आणि मारहाण केल्याशिवाय अट्टल गुन्हेगार तोंड उघडत नाही. अशा स्थितीत वरिष्ठांनी डिटेक्शनची फार अपेक्षा करू नये, असा सूर ऐकायला मिळतो आहे. सांगलीतील घटनेनंतर राज्य पोलीस दलात डिटेक्शनसाठी एक्सपर्ट म्हणून ओळखले जाणारे अधिकारी-कर्मचारी बॅकफूटवर आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

टॅग्स :Policeपोलिस