शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

पोलिसांना गुंगारा देऊन चोरटा पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:48 PM

कारागृहात नेताना चोरट्याने शिरपूर पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथे मंगळवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देकरंजीची घटना : कारागृहात नेताना ठोकली धूम, शोधण्यात रात्र गेली, थांगपत्ता नाही

ऑनलाईन लोकमतवणी : कारागृहात नेताना चोरट्याने शिरपूर पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथे मंगळवारी सायंकाळी घडली. बुधवारी विविध पथकांनी त्याचा शोध घेऊनही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा हादरुन गेली आहे.अभय सुधाकर पचारे (२२) रा. रंगनाथस्वामीनगर वणी, असे पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याला शिंदोला येथील वीज उपकेंद्रातील तार चोरी प्रकरणात पांढरकवडा पोलिसांच्या ताब्यातून शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला काही दिवसापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती.मारेगाव त्यानंतर पांढरकवडा आणि सध्या तो शिरपूर पोलिसांच्या ताब्यात होता. सोमवारी त्याची पोलीस कोठडी संपली. वणी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यामुळे त्याला घेऊन शिरपूर ठाण्याचे जमादार दीपक गावंडे, शिपायी अमोल कोवे एका खाजगी वाहनाने यवतमाळकडे जात होते. करंजी जवळ मळमळ होत असल्याचे अभयने सांगितले.उलटी करण्यासाठी वाहन थांबताच हातातील बेड्या काढून अभयने पलायन केले. अचानक घडलेल्या या घटनेने पोलिसांची पाचावर धारण बसली. या अवस्थेत त्यांनी अभयचा पाठलाग केला. त्यांना करंजी येथील तरुणांनीही मदत केली. मात्र अंधार असल्याने त्याचा थांगपत्ता लागला नाही.त्यानंतर जमादार दीपक गावंडे यांनी घटनेची माहिती शिरपूर ठाणेदार सागर इंगोले यांना दिली. ते पथकासह करंजीकडे रवाना झाले. पांढरकवड्याचे पोलीस निरीक्षक असलम खान ही आरोपीच्या शोधासाठी करंजीत आले. याप्रकरणी दीपक गावंडे यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली.सर्च मोहीम सुरूचपोलिसांना गुंगारा देऊन पळालेल्या अभयच्या शोधात मंगळवारी रात्रभर पोलिसांनी सर्च मोहीम राबविली. त्यांना करंजी येथील काही तरुणांनी मदत केली. संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र कुठेही थांगपत्ता लागला नाही. बुधवारी सायंकाळपर्यंत आरोपीचा शोध जारी होता.