लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/उमरखेड : राज्यातील एसटी बस सेवा व महानगरातील वाहतूक सेवा पूर्ववत सुरू करावी, जिल्हा बंदी हटविण्यात यावी आदी मागण्यांसाठी पुसद व उमरखेड येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे डफडी बजाव आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.पुसद येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय लहाने, भारत कांबळे, प्रमोद धुळे, देवा जगताप, बाबूलाल राठोड, हेमंत इंगोले, किशोर कांबळे, आकाश सावळे, अशोक भालेराव, शेख सलीम शेख कलीम, शेख अजिज आदींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदन पाठविले.उमरखेड येथे छोटे दुकान, ऑटोरीक्षा, छोटे व्यापारी, फुटफाथ विकेते आदींसाठी वंचित बहुजन आघडीतर्फे येथे बुधवारी डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले.येथील बसस्थानकासमोर बुधवारी दुपारी डफली बजाओ आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. या आंदोलनला भीम टायगर सेनेने समर्थन दिले. डी.के. दामोधर, अॅड. शंकर मुनेश्वर, भारत कांबळे, संबोधी गायकवाड, जॉन्टी विणकरे, आनंदा वाहुळे, संतोष जोगदंड, विलास धुळे, साहेबराव खडसे, राजू खंदारे, सिद्धार्थ दिवेकर, कुमार केंद्रेकर, कैलास कदम, संदीप विणकरे, अर्जुन बरडे, पंडित मेंजर, निकेश गाडगे आदी आंदोलनात सहभागी होते.
पुसद, उमरखेडमध्ये डफडी बजाओ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:00 IST
पुसद येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय लहाने, भारत कांबळे, प्रमोद धुळे, देवा जगताप, बाबूलाल राठोड, हेमंत इंगोले, किशोर कांबळे, आकाश सावळे, अशोक भालेराव, शेख सलीम शेख कलीम, शेख अजिज आदींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब यांना निवेदन पाठविले.
पुसद, उमरखेडमध्ये डफडी बजाओ आंदोलन
ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीचा पुढाकार : विविध मागण्यांचे प्रशासनाला निवेदन सादर