शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

घर खरेदीला पितृपक्ष आडवा, २५ टक्क्यांनी घटली खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 18:02 IST

गेल्या महिन्यातील चित्र : आता दसऱ्यानंतर उलाढाल वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पितृपक्षात घरखरेदीसह मोठे व्यवहार नागरिक करण्याचे टाळले जाते. सप्टेंबर महिन्यात पितृपक्ष आल्याने घर, शेती, प्लॉट मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार मंदावले होते. त्यामुळे मुद्रांक शुल्क कार्यालयातील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे बघावयास मिळाले. नेहमीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी घरांची खरेदी घटल्याचे सांगितले जाते.

पितृपक्षात पूर्वजांचे आशीर्वाद घेतले जाते. या काळात घरासह अन्य मालमत्तेची खरेदी करण्याचे नागरिक टाळतात. पूर्वावार चालत आलेली परंपरा अजूनही पाळली जात आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर असा पितृपक्षाचा कालावधी होता. या काळात अनेकांनी घर खरेदीचे व्यवहार करण्याचे टाळले. काहींनी सौदेपत्र करून घेतले. घर, शेती, प्लॉटच्या व्यवहारात अनेक दलाल गुंतले आहेत. त्यांच्याशिवाय हे व्यवहार पूर्ण होत नाही. आता आगामी काळात खरेदी- विक्रीच्या व्यवहाराची उलाढाल वाढणार आहे. 

सप्टेंबरमध्ये दीड हजार मालमत्तांची विक्रीपितृपक्षात घर खरेदी करण्याचे टाळणारा मोठा वर्ग आहे. मात्र, काही नागरिक शुभ, अशुभमच्या भानगडीत पडले नाहीत. त्यांनी आपल्या सोयीनुसार ठरल्याप्रमाणे व्यवहार केला आणि मोकळे झाले. जिल्ह्यात जवळपास दीड हजारांवर मालमत्तांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्के घट 

  • यवतमाळ शहरासह जिल्ह्यात महिन्याला चार हजारांपेक्षा जास्त घर, शेती, प्लॉट विक्रीचे व्यवहार मुद्रांक नोंदणी शुल्क कार्यालयातून केले जातात. 
  • सप्टेंबर महिन्यात पितृपक्ष आल्याने या व्यवहारात २५ ते ३० टक्के घट आली. गेल्या वर्षीही अशी स्थिती होती. 

आता दिवाळीत वाढणार उलाढाल पितृपक्ष २ ऑक्टोबरला संपला. दसरा सणही उत्साहात साजरा करण्यात आला. सप्टेंबर महिन्यांत नागरिकांनी घर, प्लॉटची पाहणी करून ठेवली आहे. काहींनी सौंदेही पक्के केले आहे. आता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून व्यवहार केले जाणार आहे. यानंतरही घर, प्लॉट खरेदीच्या व्यवहारात तेजी राहणार असल्याचे सांगितले जाते. नागरिक आता घरांची पाहणी करीत असून खरेदीचे नियोजन करण्याच्या प्रयत्नात आहे.

पितृपक्षाचे कारण पितृपक्षात सोने, घर, चारचाकी वाहन, शेती, आदींची खरेदी करणे शुभ मानले जात नाही. अनेक नागरिक ही परंपरा अजूनही पाळतात. यामुळे या कालावधीत बाजारपेठेतील उलाढाल काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येते

टॅग्स :Yavatmalयवतमाळ