शहरं
Join us  
Trending Stories
1
आत्मा कायम राहत असतो, हा भटकता आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
2
SA vs BAN : WHAT A MATCH! माफक लक्ष्य पण संघर्ष मोठा; गोलंदाजांची कमाल, अखेर बांगलादेश चीतपट
3
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
4
मणिपूर वर्षभरापासून शांततेच्या शोधात, प्राधान्याने विचार करावा लागेल: सरसंघचालक मोहन भागवत
5
'तुमच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास...', नवाज शरीफ यांनी केले पीएम नरेंद्र मोदींचे अभिनंदन
6
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
7
PM Modi Cabinet : गुजरातचे मनसुख मांडविया देशाचे नवे क्रीडा मंत्री; कोण आहेत ते? जाणून घ्या
8
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
9
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
10
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
11
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
12
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
13
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
14
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
15
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
16
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
17
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
18
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
19
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
20
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त

ऐन पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:35 AM

ज्ञानेश्वर ठाकरे महागाव : पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील वाकानवासीयांचा वनवास संपता संपत नाही. ऐन पावसाळ्यात या गावातील महिला व ...

ज्ञानेश्वर ठाकरे

महागाव : पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील वाकानवासीयांचा वनवास संपता संपत नाही. ऐन पावसाळ्यात या गावातील महिला व नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

२००५ मध्ये वाकान गाव पुराने वेढले होते. जवळचा नाला दुथडी भरून वाहत होता. दरवर्षीच पावसाळ्यात नाल्याचा पूर सळो की पळो करून सोडतो. पूर परिस्थितीनंतर त्या दरम्यान तब्बल १५ कुटुंबे नाल्यापलीकडे वास्तव्यास गेली. त्यांना आता जवळपास १५ वर्षे झाली. परंतु अद्याप त्यांना कुठल्याही नागरी सुविधा मिळत नाही. हंडाभर पाणी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. भर पावसाळ्यात व नाल्याला पूर असताना जीव मुठीत घेऊन पाण्यासाठी पुरातून येथील महिला पायपीट करतात.

या गावात ९ जुलै २००५ रोजी दूधगंगा नदीला आलेल्या महापुराने होत्याचे नव्हते करून टाकले. अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली. या नैसर्गिक आपत्तीत अनेक कुटुंबांची वाताहत झाली. एका रात्रीत सर्वस्व गमावलेल्या नागरिकांना विस्थापित व्हावे लागले. त्यात ७१ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही १७ वर्षांनंतर प्रलंबित आहे. महापुराच्या तांडवानंतर काहींनी गावाच्या दुसऱ्या टोकाला धावपळनगर म्हणून वसाहत स्थापन केली. तेथे ३० ते ३५ घरे आहे. त्यांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. आजही तेथे पाणी उपलब्ध नाही. गुंडभर पाण्यासाठी महिलांना नदीतून मार्गक्रमण करीत जीव मुठीत घेऊन वाकानमधील पूरक नळयोजनेवरून पाणी आणावे लागते.

बाॅक्स

लोकप्रतिनिधींची अनास्था कायमच

या मतदारसंघांमध्ये मनोहरराव नाईक यांच्याकडे २० वर्षे मंत्रिपद होते. मात्र, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व कायम दुर्लक्षित धोरणामुळे पूरग्रस्त सुविधांपासून वंचित राहिले. स्थानिक नेत्यांनी केवळ पोकळ आश्वासने दिली. प्रत्येक निवडणुकीत मत मागितले. मात्र, पुनर्वसन अधांतरीच लटकले. किमान आतातरी आमदार व यंत्रणेने तात्काळ उपाययोजना करून नागरिकांची हेळसांड थांबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गावात जर कुणाचे निधन झाले तर अंत्यसंस्कारासाठी नाल्याच्या पलीकडे पुराच्या पाण्यातून जावे लागते. जास्त पाणी असल्यास पुराचे पाणी उतरण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे या नाल्यावर पुलाची आवश्यकता असल्याचे सरपंच अश्वजीत भगत यांनी सांगितले.

240721\img-20210724-wa0054.jpg

जीव मुठीत घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी महिला पुरातून मार्ग क्रमन करताना,तालुक्यातील.वाकांन येथील परिस्थिती