शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पुलावरून पीकअप उलटला, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2022 22:17 IST

यदू मोतीराम जाधव (५५) रा. नायगाव असे मृताचे नाव आहे. यदू व इतर त्याचे तीन सहकारी पायदळ प्रातविधीसाठी जात असताना कळंबवरून येत असलेल्या मॅक्स पिकअप वाहनाने धडक दिली. या वाहनामध्ये १४ मजूर बसून होते. ते बुलडाणा येथे कामासाठी जात होते. हे मजूरही अपघातात जखमी झाले. घटनेनंतर जखमींना यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चंद्रपूर येथून बुलडाणा जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाला अपघात झाला. चालकाला डुलकी आल्याने वाहनावरचे नियंत्रण सुटले. यात रस्त्यावर पायदळ जाणाऱ्या तिघांना धडक बसली. त्यामध्ये एकजण जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी ७ वाजता कळंब-बाभूळगाव मार्गावरील नायगाव येथे घडली. यदू मोतीराम जाधव (५५) रा. नायगाव असे मृताचे नाव आहे. यदू व इतर त्याचे तीन सहकारी पायदळ प्रातविधीसाठी जात असताना कळंबवरून येत असलेल्या मॅक्स पिकअप वाहनाने धडक दिली. या वाहनामध्ये १४ मजूर बसून होते. ते बुलडाणा येथे कामासाठी जात होते. हे मजूरही अपघातात जखमी झाले. घटनेनंतर जखमींना यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. ममता सुभाष मेश्राम, रमेश सखाराम कांबळे (४५), सुवर्णा विनायक लोणबले (३४), ज्योत्स्ना हेमराज हजरे (३०), ममता सुधाकर मेश्राम (३५), सुषमा दिनेश मेश्राम (३५), शालू गुरुदास जराते (३५), हेमराज मनोहर हजारे (३५), विनायक बापूजी लोणबले (३४), दाकराम केवलराम बोरसे (३६), मोरेश्वर कालिदास गेडाम (३४), जयश्री यादव लोणबले (३०), निराशा हेमंत मडावी (३०) अशी जखमी मजुरांची नावे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

रुग्णवाहिका चालक आला मदतीला अपघातात जखमी झालेल्या चंद्रपूरच्या मजुरांवर उपचार व्हावेत यासाठी रुग्णवाहिका चालक मनोज लुटे, मदतीला धावून आला. त्याने या जखमी मजुरांच्या भोजनाची व्यवस्था स्वखर्चातून केली. जखमींना चंद्रपूर पोहोचविण्यासाठीसुद्धा वाहनाची तरतूद करण्यात त्याने आपल्या सहकाऱ्यांची मदत घेतली. या मदतीमुळे चंद्रपुरातील जखमी मजुरांची गैरसोय टळली.

 

टॅग्स :Accidentअपघात