शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेती चोरीचा दंडही भरला जात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 22:19 IST

दोन वर्षांपूर्वी वाऱ्हा-१, वाऱ्हा-२, हिरापूर, रोहिणी हिरापूर, झुल्लर, रामतीर्थ या सहा रेती घाटांचे लिलाव झाले होते. त्यातून शासनाला रॉयल्टी स्वरूपात पाच कोटी रुपयांचा महसूल मिळाला. याशिवाय इतरवेळी टाकण्यात आलेल्या ठिकठिकाणच्या धाडी व लिलावात गेलेल्या रेतीघाटांवरील गैरप्रकारात जवळपास एक कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ठळक मुद्देमहसूलचेही दुर्लक्ष : राळेगाव तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिजाची तस्करी

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : गौण खनिजाची चोरी पकडल्यानंतर ठोकलेला दंडही तस्करांकडून भरला जात नाही. महसूल विभागाच्या नरमाईच्या धोरणामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे. एकीकडे मुरूम, रेतीची चोरी सुरूच असताना महसूल विभागाकडून मात्र नाममात्र कारवाई होत आहे. शिवाय या कामासाठी कालबाह्य वाहने वापरली जात असताना आरटीओचीही डोळेझाक सुरू आहे.दोन वर्षांपूर्वी वाऱ्हा-१, वाऱ्हा-२, हिरापूर, रोहिणी हिरापूर, झुल्लर, रामतीर्थ या सहा रेती घाटांचे लिलाव झाले होते. त्यातून शासनाला रॉयल्टी स्वरूपात पाच कोटी रुपयांचा महसूल मिळाला. याशिवाय इतरवेळी टाकण्यात आलेल्या ठिकठिकाणच्या धाडी व लिलावात गेलेल्या रेतीघाटांवरील गैरप्रकारात जवळपास एक कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. इतर दहा घाट त्यावेळी लिलावात गेले नसल्याने त्या काळातही कोट्यवधींची रेती चोरी सुरुच राहिली होती. गतवर्षी तालुक्यात एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. त्यामुळे या काळात पाच कोटी रुपयांपेक्षा अधिकची रेती चोरी झाल्याचा अंदाज आहे.तहसीलदार रवींद्र कानडजे यांनी केलेल्या कारवाईच्या सहा प्रकरणात काही लोकांनी दंडाची रक्कमही भरलेली नाही. ५ व ६ नोव्हेंबर रोजी ठोठावलेला दंड प्रकाश पोपट (वाढोणाबाजार) व अमित बन्नावरे (राळेगाव) यांनीच भरला आहे. इतर प्रकरणात दंडाची रक्कम भरण्यास रेती चोरट्यांकडून चालढकल केली जात आहे. १२ जानेवारीच्या परिपत्रकानुसार गौण खनिज चोरी प्रकरणात दंडाची रक्कम पाचपट करण्यात आली. त्यानंतर याची धडकी भरून रेती चोरी कमी होण्याऐवजी वाढली असल्याचे सांगितले जाते. या सर्व बाबींना महसूल, पोलीस व आरटीओची यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.रुग्णालयाच्या दुरवस्थानव्याने आलेले तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे यांनी स्वत: पाच प्रकरणात आठ लाख रुपये दंड ठोठावला आहे. या काळात महसूल विभागाची इतर चमू पोलीस विभाग, आरटीओ आदींतर्फे अपवादात्मकही कारवाई झालेली नाही. अपर जिल्हाधिकारी सुनील महिेंद्रकर यांचा एक अपवाद वगळता यवतमाळच्या अधिकाऱ्यांनी, विविध पथकांनी या काळात कोणत्याही घाटावर धाडी टाकून कारवाई केलेली नाही. अनेक वाहने रेती चोरीकरिता नवी, जुनी खरेदी केली आहे. यात ट्रॅक्टर, मोठे टिप्पर, जेसीबी, पोकलँड आदींचा समावेश आहे.

टॅग्स :sandवाळू