शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

अपंग पोलीस शिपायाला सेवानिवृत्तीपर्यंत घरबसल्या वेतन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 13:34 IST

ड्युटीवर जाताना जखमी होऊन कायम अपंगत्व आलेल्या व सध्या अंथरुणाला खिळलेल्या पोलीस शिपायाला तो सेवानिवृत्त होईपर्यंत घरबसल्या वेतन द्या, असे आदेश मुंबई ‘मॅट’चे उपाध्यक्ष प्रवीण दीक्षित (प्रशासन) व न्यायिक सदस्य ए.डी. कारंजकर यांनी १४ जून रोजी दिले आहेत.

ठळक मुद्दे‘मॅट’चे आदेश तांत्रिक कारणासाठी कुणाचेही नुकसान न करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ड्युटीवर जाताना जखमी होऊन कायम अपंगत्व आलेल्या व सध्या अंथरुणाला खिळलेल्या पोलीस शिपायाला तो सेवानिवृत्त होईपर्यंत घरबसल्या वेतन द्या, असे आदेश मुंबई ‘मॅट’चे उपाध्यक्ष प्रवीण दीक्षित (प्रशासन) व न्यायिक सदस्य ए.डी. कारंजकर यांनी १४ जून रोजी दिले आहेत.बाळासाहेब नाना वाकचौरे असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. ते मुंबईतील घाटकोपर येथे कार्यरत होते. त्यांना घर बसल्या पदोन्नती, वेतनवाढ व गेल्या १५ वर्षातील थकबाकी देण्याचे आदेशही जारी करण्यात आले. या प्रकरणात शासनाच्यावतीने मुख्य सरकारी अभियोक्ता स्वाती मंचेकर तर वाकचौरे यांच्यावतीने अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांनी काम पाहिले. या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त व गृहखात्याच्या प्रधान सचिवांना प्रतिवादी बनविण्यात आले होते. २ मे २०१३ रोजी बाळासाहेब वाकचौरे ड्युटीवर जात असताना रस्त्यातील एका झाडाची फांदी त्यांना तुटलेली दिसली. ही फांदी पडल्यास कुणाला इजा होऊ शकते याचा विचार करून ते ही फांदी कायमची तोडून फेकण्यासाठी झाडावर चढले. मात्र यात ते फांदीसह खाली पडले. त्यांच्या मेंदू, डोळा, मान व शरीराच्या अन्य भागाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र त्यांचे बहुतांश अवयव निकामी होऊन आरोग्यविषयक गुंतागुंत वाढली. पर्यायाने ते अंथरुणाला खिळले. इकडे शासनाने पगार बंद केल्याने पत्नी सोडून गेली. आई-वडील त्यांची सुसुषा करू लागले. दरम्यान आपण आता नोकरी करू शकत नाही म्हणून ३१ ऑक्टोबर २०१४ ला वाकचौरे यांनी पोलीस शिपाई पदाचा राजीनामा दिला. तो १६ फेब्रुवारी २०१५ ला मंजूर करण्यात आला. परंतु त्यानंतर सहा महिन्यांनी १४ ऑगस्ट २०१५ ला त्यांनी हा राजीनामा परत घेत असल्याबाबतचा अर्ज दिला. मात्र २३ ऑक्टोबर २०१५ ला मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी हा अर्ज नाकारला. त्यानंतर अपंग कायदा १९९५ मधील कलम ४७ चा आधार घेत वाकचौरे यांनी अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई ‘मॅट’मध्ये धाव घेतली. ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी यांनी अंतरिम आदेश देताना वाकचौरे यांना लाभ देण्याचे निर्देश दिले होते. त्यावरून पोलीस आयुक्तांनी विशेष बाब म्हणून नोकरीत कायम ठेवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. मात्र शासनाने तो नाकारला. एकदा राजीनामा दिल्यावर पुन्हा सेवेत घेता येत नसल्याचे शासनाने स्पष्ट केले. मात्र या मुद्यावर ‘मॅट’मध्ये विविध निर्णयांच्या आधारे बराच खल झाला. अखेर केंद्र शासनाचा १९९५ चा अपंगांना संरक्षण देणारा कायदा श्रेष्ठ ठरला व ‘मॅट’ने वाकचौरे यांच्या बाजूने निर्णय दिला. तीन महिन्यात त्याची पूर्तता करण्याचे आदेश जारी करण्यात आले. या प्रकरणात वाकचौरे यांच्यावतीने अ‍ॅड. भूषण बांदिवडेकर, अ‍ॅड. गौरव बांदिवडेकर यांनी सहकार्य केले.पोलीस आयुक्त, सचिवांना दहा हजार दंडया प्रकरणातील प्रतिवादी मुंबई पोलीस आयुक्त व गृहखात्याच्या प्रधान सचिवांना संयुक्तरीत्या दहा हजारांचा कोर्ट खर्च म्हणून दंड बसविण्यात आला. कायद्याचा किस पाडणे, मदत व सहानुभूतीची भूमिका नसणे, त्यामुळे न्यायासाठी नागरिकांना कोर्टात यावे लागणे आदी मुद्यांवरून ‘मॅट’ने हा दंड बसविला.

टॅग्स :Policeपोलिस