शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

साडेसहा कोटींच्या कामांची हिस्सेवाटणी

By admin | Updated: March 31, 2015 01:52 IST

वनखात्यातील कामे वाटपावरून भाजपा-शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर

वनखात्याचे मार्च एंडिंग : शिवसेना-भाजपाला झुकते मापयवतमाळ : वनखात्यातील कामे वाटपावरून भाजपा-शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर सोमवारी तोडगा काढत या कामांची हिस्सेवाटणी करण्यात आली. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीतील कंत्राटदार-कार्यकर्त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला गेला. जिल्हा विकास योजनेतून यवतमाळ वनविभागांतर्गत सुमारे साडेसहा कोटी रुपयांच्या कामांचे वाटप करायचे होते. शिवसेनेने या कामातील मोठा वाटा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आम्हीही सत्तेत आहो, असे म्हणून भाजपाने समान वाटा मिळावा म्हणून आग्रह धरला होता. तिकडे काँग्रेस व राष्ट्रवादीनेसुद्धा आमचे समाधान न झाल्यास विधिमंडळात आवाज उठवू, अशी भूमिका घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून कामे वाटपाचा हा वाद सुरू होता. वादग्रस्त विषय असल्याने काही दिवस तो बाजूला ठेवला गेला होता. परंतु मार्च एंडिंग आल्याने त्यावर तोडगा काढणे आवश्यक होते. अन्यथा निधी शासनाला परत जाण्याची भीती होती. म्हणून या निधी वाटपावर अखेर सोमवारी तोडगा काढला गेला. त्यानंतरही शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांच्या कार्यकर्ते तथा कंत्राटदारांमध्ये ‘कही खुशी कही गम’ असे चित्र पाहायला मिळाले. साडेसहा कोटींपैकी सर्वाधिक साडेतीन कोटींचा निधी शिवसेनेच्या मर्जीतील कंत्राटदारांना कामांच्या निमित्ताने वाटला जाणार असल्याची माहिती आहे. भाजपाला सुमारे दोन कोटी रुपये दिले जातील, तर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रत्येकी ५० लाखांची कामे देवून खुश करण्याचा प्रयत्न केला गेला. सेनेच्या बालेकिल्ल्यातीलच एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने जास्त निधी मिळावा म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र त्यांना ५० लाखातच गुंडाळण्यात आले. कामे वाटपाबाबत भाजपा तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीतील धुसफुस मात्र कायम आहे. आम्ही युतीने सत्तेत असताना आम्हाला निधी कमी का, असा भाजपाच्या गोटातील सवाल आहे. वनविभागांतर्गत ही कामे मिळावी म्हणून कंत्राटदारांनी आपल्या राजकीय गॉडफादरमार्फत जोरदार फिल्डींग लावली होती. त्यातूनच शिवसेना नेत्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी मंत्रालयातील विविध कक्षातून यवतमाळात दूरध्वनी खणखणल्याचे सांगितले जाते. मात्र शिवसेनेने या दबावाला फारशी भीक न घालता ५० टक्के निधी अर्थात कामे आपल्या निकटवर्तीय कार्यकर्ते तथा कंत्राटदारांना बहाल केल्याचे सांगण्यात येते. या निधी वाटपावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी दुपारपासूनच बैठक झाली. तेथे सर्वच पक्षाच्या कंत्राटदारांनी मोठी गर्दीही केली होती. एकट्या यवतमाळ वनविभागांतर्गत साडेसहा कोटींच्या या निधी वाटपात माती नाला बांध, सिमेंट बंधारे, अनगड दगडी बांध, पाणवठे, चर, नाल्या आदी कामांचा समावेश आहे. याप्रकरणी यवतमाळ उपवनसंरक्षक कार्यालयातील सहायक वनसंरक्षक वाभडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, यवतमाळ जिल्ह्याला नियोजनमधून ‘एनटीएसपी’ हेडवर साडेचार कोटी रुपये मिळाले आहे. यातून रोपवन आणि अतिक्रमण झालेल्या ठिकाणी नियमित करण्याची कामे केली जाणार आहेत. इको टुरिझम अंतर्गत तीन कोटी रुपये निधी मिळाला. त्यातून दारव्हा, नेर, दिग्रस, यवतमाळातील मनदेव व पांढरकवड्यातील वृंदावन येथे उद्यान विकासाची कामे केली जाणार आहे. निसर्ग संरक्षणासाठी दीड कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला मिळाला. सध्या वनखात्याकडे कोणताही निधी शिल्लक नाही. ‘डीपीसी’तून सोमवारी झालेल्या साडेसहा कोटींच्या कामे वाटपाबाबत विचारणा केली असता ही कामे अद्याप या कार्यालयाला प्राप्त झाली नसल्याचे वाभडे यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)अधिकाऱ्यांना तंबी दिल्याची चर्चाकामे मिळविण्यासाठी भाजपा व शिवसेनेचे बरेच पदाधिकारी प्रयत्नरत होते. त्यात सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना यशही आले. सेना नेत्याच्या जवळच्या नातेवाईकाला तब्बल सव्वा कोटींची कामे दिली गेली. भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने तर आपल्याशिवाय कुणाला काम मिळू नये म्हणून थेट नियोजन विभाग व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात जावून तंबीच दिल्याचे बोलले जाते. सायंकाळी या कामे वाटपाचा आराखडा नियोजन विभागाला पाठविला जाणार आहे. या कामे वाटपात ‘हिशेब’ झाल्याची चर्चा राजकीय गोटात आहे.