शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

डेहणी सिंचन प्रकल्प अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 22:29 IST

आघाडी सरकारच्या काळात आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प डेहणी येथे साकारण्यात आला. आता या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील काम बाकी असून ते अर्धवट ठेवले आहे. कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प पूर्णत्वास येऊनही शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना लाभ नाही : आशिया खंडातील मोठ्या प्रकल्पाची वाताहत, प्रशासनाचे दुर्लक्ष

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : आघाडी सरकारच्या काळात आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प डेहणी येथे साकारण्यात आला. आता या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील काम बाकी असून ते अर्धवट ठेवले आहे. कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प पूर्णत्वास येऊनही शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.नेर तालुक्यातील शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन करता यावे यासाठी उपसा सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. बेंबळा प्रकल्पाला पर्याय म्हणून डेहणी उपसा प्रकल्प काँग्रेसने मंजूर करून पूर्णत्वास आणला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संरक्षित सिंचनासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर ठिबक संच देण्याचा निर्णयही घेतला. मात्र नंतर सरकार बदलल्याने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले. १९९७ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प आता पूर्ण होऊनही केवळ जुजबी कारणांमुळे त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. कोट्यवधी रुपयांची यंत्रणा डेहणी येथे बेवारस पडलेली आहे. सिंचन विभागाचे अधिकारी याकडे फिरकून पाहात नाही. केवळ राजकीय वशीला असलेल्या शेतकºयांनाच या प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जात आहे. उदात्त हेतू ठेऊन नेर तालुक्यातील चिखली, मांगलादेवी, धनज, ब्राह्मणवाडा, टाकळी, कुऱ्हेगाव यासह इतर गावांमध्ये सिंचनासाठी संरक्षित पाणी देण्यावर प्रयत्न करण्यात आले. मात्र अद्यापही प्रकल्पाचे पाणी पोहोचलेच नाही. दहा-बारा शेतकऱ्यांसाठी गावात टाकी बसविण्यात आली आहे. मात्र याचे नियंत्रण योग्य पद्धतीने होत नसल्याने पाण्याचा अपव्यय होतो व शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही.प्रकल्पाच्या कार्यालयात कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री बेवारस पडून आहे. याठिकाणी साधा चौकीदारही पहावयास मिळत नाही. ‘लोकमत’चा प्रतिनिधी याठिकाणी गेला असता येथे एकही अधिकारी, कर्मचारी उपस्थित नव्हता. डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाची यंत्रणा आता चोरट्यांचे धन बनली आहे. सरकार बदलल्यानंतर पूर्णत्वास आलेल्या प्रकल्पाचे काम थांबले आहे. शेतकरी हितात राजकारण आडवे येत असल्याचे दिसते.सहा वर्षांपासून काम रखडलेडेहणी उपसा सिंचन प्रकल्पाचा उद्देश पायदळी तुडविला जात आहे. शेतकºयांचे उत्पन्न वाढावे हा उद्देश ठेऊन काँग्रेस सरकारने हा प्रकल्प तयार केला. मात्र मागील सहा वर्षांपासून या प्रकल्पाचे काम अत्यंत संथगतीने चालू आहे. शेतकऱ्यांची मागणी असूनही पाणी दिले जात नाही. कितीतरी अपेक्षा ठेऊन हा प्रकल्प तयार झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निधीपण दिला. मात्र भ्रष्ट कारभाराने अजूनही पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले नाही, असे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंजाबराव खोडके यांनी सांगितले.

टॅग्स :Damधरण