शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

प्रमाणपत्राने वाढले पालकांचे टेन्शन

By admin | Updated: June 22, 2014 00:11 IST

प्रवेशासाठी लागणारे विविध प्रकारचे प्रमाणपत्र निकालानंतरच काढण्याची धावपळ पालकांकडून केली जाते. प्रवेशाच्या मुदतीची टांगती तलवार असल्याने अनेक पालकांचे या काळात टेन्शन वाढते.

सेतू सुविधा केंद्र : प्रमाणपत्राचे ५०० अर्ज प्रलंबितयवतमाळ : प्रवेशासाठी लागणारे विविध प्रकारचे प्रमाणपत्र निकालानंतरच काढण्याची धावपळ पालकांकडून केली जाते. प्रवेशाच्या मुदतीची टांगती तलवार असल्याने अनेक पालकांचे या काळात टेन्शन वाढते. याच संधीचा फायदा घेऊन सेतू सुविधा केंद्राच्या परिसरात आर्थिक लूट केली जाते. बारावीच्या निकालानंतर यवतमाळ तहसीलमध्ये ५०० अर्ज प्रलंबित आहेत. सेतू केंद्राने उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे यांच्या नावाने जातीच्या प्रमाणपत्राचे प्रस्ताव तयार केले होते. त्यांची बदली झाल्याने सदर प्रस्ताव परत बोलविण्यात आले. नव्याने रुजू झालेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नावाने हे प्रस्ताव तयार केले जात आहे. त्यामुळे येथे जात प्रमाणपत्राचे अर्ज प्रलंबित आहे. या प्रक्रियेत तहसीलच्या ९ क्रमांकाच्या कक्षातील ‘भैया’ची मनमर्जी चालते तर, बरेचदा ‘भगत’ पावत नसल्याने प्रस्ताव अडकून पडतात. उपविभागीय कार्यालयात बेलसरेंचा अडसरही या प्रस्तावांना पार करावा लागतो. ही प्रक्रियाच खऱ्या अर्थाने अनेकांची डोकेदुखी वाढवत आहे. वरिष्ठांकडून पारदर्शक प्रशासनाची ग्वाही दिली जात असली तरी, यांची मर्जी संपादित केल्याशिवाय सहजासहजी कागद पुढे सरकत नाही. शासनाने प्रत्येक प्रमाणपत्रासाठी दर निश्चित केले आहे. विहित मुदतीत ते देण्याचे नियमही घालून दिले आहे. एन वेळेवर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या पालकांकडे निर्धारित वेळेपर्यंत थांबण्याची सवड राहात नाही. याच घिसाडघाईचा फायदा तहसील कार्यालय आणि सेतू सुविधा केंद्र परिसरात बसलेले दलाल उठवतात. अडचण ओळखून या कामासाठी नियुक्त कर्मचारीसुध्दा आपले दर वाढवितात. अशा स्थितीत नियोजनबध्द पध्दतीने काम करणाऱ्या सर्वसामान्य पालकांची मात्र मोठी दमछाक होते. रांग तोडून वशीलेबाजी आणि लाच देऊन काम करून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे येथील यंत्रणा भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे. यवतमाळ तहसीलमध्ये जूनचा पहिला आठवडा दलालांसाठी सुगीचा असतो. अधिकारी व कर्मचारी विविध सबबी पुढे करून काम लांबविण्याचा प्रयत्न करतात. विशिष्ट व्यक्तिकडून फाईल आल्यानंतर हातोहात काम करून दिले जाते. यात नियमाच्या अधीन राहून अर्ज करणाऱ्यांना विहीत मुदतीपेक्षा अधिक काळ ताटकळत ठेवले जाते. (कार्यालय प्रतिनिधी)