शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदी खोऱ्यात रेती तस्करांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:19 IST

वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या खोऱ्यात रेती तस्करांची अक्षरश: दहशत पसरली आहे. एकीकडे रेती घाटांचे लिलाव न झाल्याने बांधकामे प्रभावित झाली असताना दुसरीकडे काही बिल्डरांना रेती तस्करांकडून दामदुपटीने रेती पुरविली जात आहे.

ठळक मुद्देलाखो रूपयांचा माल लंपास : महसूल विभागाच्या ‘मधूर’ संबंधाने चोरट्यांची चांदी

मो.आसिफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या खोऱ्यात रेती तस्करांची अक्षरश: दहशत पसरली आहे. एकीकडे रेती घाटांचे लिलाव न झाल्याने बांधकामे प्रभावित झाली असताना दुसरीकडे काही बिल्डरांना रेती तस्करांकडून दामदुपटीने रेती पुरविली जात आहे. या विषयात महसूल विभागाने डोळ्यावर पट्ट्या बांधल्या असून तस्करांशी असलेले मधूर संंबंधच रेतीच्या चोरीला चालना देत असल्याचे बोलले जात आहे.रेती घाटांचे लिलाव न्यायालयीन प्रक्रियेत अडकून असल्याने सध्या सर्वत्र रेती टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे सर्वसामान्यांची बांधकामे प्रभावित झाली असली तरी बांधकाम व्यावसायिकांना मात्र सहजरित्या रेती उपलब्ध होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तस्करांनी वणी तालुक्यातून वाहणाºया वर्धा नदीच्या खोºयात अक्षरश: आपला ठिय्या मांडला आहे. दररोज शेकडो ब्रास रेतीची चोरी या नदीतून केली जात आहे. यासंदर्भात काही गावातील पोलीस पाटलांनी महसूल विभागाला तोंडी माहिती दिली. परंतु महसूल विभागाकडून या तस्करांविरूद्ध कोणतीही कारवाई केली जात नाही. दिवसा नदीतून रेती पळवायची, त्याचा साठा चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस परिसरात करायचा आणि रात्रीच्यावेळी वणी परिसरातून मागणी केलेल्या ठिकाणावर ती रेती पोहोचवायची, असा गोरखधंदाच या तस्करांनी सुरू केला आहे.रेतीघाट सुरू असताना रेतीची किंमत प्रति ब्रास दोन ते अडीच हजार रूपये होती. मात्र रेतीघाट बंद असल्याने चोरीच्या रेतीची किंमत दुप्पट झाली आहे. ज्यांना गरज आहे, ते लोक दामदुप्पट पैसे मोजून रेती खरेदी करीत आहे. वणी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहे. या बांधकामांवर रेती कुठून पुरविली जाते, याची साधी चौकशी करण्याचे सौजन्यदेखिल महसूल विभागाकडून दाखविले जात नाही.महसूल विभागाचे काही कर्मचारीच या तस्करांशी संधान साधून असून वरिष्ठ अधिकाºयांची दिशाभूल करून तस्करांना ते सहकार्य करीत असल्याचे बोलले जात आहे. वणी तालुक्यातून विदर्भा, निगुर्डा व वर्धा या प्रमुख नद्या वाहतात. यंदा सुरूवातीला या नद्यांना पुर आल्याने या नदीत चांगल्या प्रतीची वाळू आली आहे. मात्र अद्याप रेती घाटाचे लिलाव न झाल्याने या नदीतील रेतीचा अधिकृत उपसा बंद आहे. त्यामुळे रेती तस्करांनी सध्या डोकेवर काढले असून चंद्रपूर जिल्ह्यातील काही तस्करांनी या परिसरात आपले एजंट नेमले आहेत. त्यांच्या माध्यमातून चोरटी रेती पुरविली जाते.‘रात्रीस खेळ चाले’चंद्रपूर जिल्ह्यातील वाळूचे तस्कर वणी तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीतून रेती लंपास करतात. त्याची साठवणूक घुग्गूस येथे केल्यानंतर रात्रीच्या अंधारात ती वाळू वणी परिसरात पोहोचविली जात आहे. मध्यंतरी महसूल विभागाने या तस्करीविरूद्ध पाश आवळले होते. परंतु नंतर कारवाया थंडावल्या.

टॅग्स :sandवाळू