बिजोरा : महागाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाळा सुरू होऊनही पाणीटंचाई कायम आहे. प्रशासनाने काही गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण केले. मात्र या विहिरींचे पाणीही पुरेसे ठरत नाही. बिजोरा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. प्रशासनाने तेथे एका विहिरीचे अधिग्रहण केले आहे. या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी आहे. फुलाजीबाबा देवस्थानच्या बोअरवरूनही पाणी आणले जात आहे. ( छाया : सदानंद लाहेवार, बिजोरा)
पावसाळ्यातही पाण्यासाठी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 21:59 IST