शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

दोन आरोग्यसेविकांच्या अटकेने संघटना आक्रमक

By admin | Updated: October 11, 2015 00:46 IST

कळंब पोलिसांनी प्रभारी तालुका अधिकारी डॉ. मंगला उईके यांच्या सांगण्यावरून दोन आरोग्यसेविकांना बोगस डॉक्टर म्हणून अटक केली. हा प्रकार गंभीर आहे.

ठाणेदारांना आव्हान : आरोप सिद्ध करायवतमाळ : कळंब पोलिसांनी प्रभारी तालुका अधिकारी डॉ. मंगला उईके यांच्या सांगण्यावरून दोन आरोग्यसेविकांना बोगस डॉक्टर म्हणून अटक केली. हा प्रकार गंभीर आहे. कळंब ठाणेदारांनी हा प्रकार सिद्ध करून दाखवावा, असे खुले आव्हान महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेने शनिवारी पत्रकार परिषदेत दिले. सदर आरोग्यसेविकांनी कुणालाही औषध विकले नाही. तशी तक्रार नाही, एकाही रूग्णाचे बयाण नाही. या स्थितीत ठाणेदारांनी औषध विक्रेत्यांचे रॅकेट संबोधले. ठाणेदारांनी हे सिद्ध करून दाखवल्यास आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ. मात्र हे सिद्ध न झाल्यास ठाणेदारांची उचलबांगडी करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे काही निकष आहेत. या निकषाला पायदळी तुडविण्यात आले. सरकारी नोकरी करणाऱ्या आरोग्य सेविकांवर औषधी पुरविल्याचा आरोप करण्यात आला. आरोग्य सेविका आपली जबाबदारी बजावत असताना त्यांना अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्या सोबत महिला पोलीस नव्हते, असा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. गेल्या ११ वर्षांपासून हे कर्मचारी गोरखधंदा करीत असल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला. एक रूपयाच्या तरी विक्रीचा आरोप सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान ठाणेदारांना पत्रकार परिषदेत देण्यात आले. हा प्रकार सुडापोटी झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. १४ आॅक्टोबरपासून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनास बसण्याचा इशारा संघटनेने दिला. यावेळी त्यांनी ठाणेदार आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा काम बंद आंदोलनाची मागणी केली. यावेळी त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे करण्याचे आवाहन केले. या पत्रकार परिषदेत कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे, कार्याध्यक्ष शुभांगी गावंडे, छाया काळे, गणेश बिहाडे, विनोद खोब्रागडे, मोरेश्वर गडलिंग आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)