नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 05:00 AM2021-09-23T05:00:00+5:302021-09-23T05:00:16+5:30

 जिल्हाधिकारी  म्हणाले की, यापूर्वी प्रत्येक तालुक्याला लोकसंख्यानिहाय लस उपलब्ध करून देण्यात येत होती. मात्र, आता झालेल्या वापरानुसार लस साठा पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे लसीच्या वापरावर लससाठा प्राप्त होईल. मोबाइल व्हॅक्सिनेशन व्हॅन तालुकास्तरावर उपलब्ध करून देण्यात आली असून, याद्वारे  लसीकरणासाठी केंद्रावर येऊ न शकणाऱ्या दिव्यांग आणि  आजारी लोकांचे लसीकरण  करण्यासाठी नियोजन करावे.

Order to complete corona vaccination in the district by November | नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचा आदेश

नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचा आदेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :  येत्या दोन ते तीन महिन्यांत जिल्ह्यात शंभर टक्के कोरोना लसीकरण पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेली गावे केंद्रित करून तेथे  लसीकरण करावे.  ग्रामीण भागात दर दिवशी प्रत्येक लसीकरण केंद्रामार्फत किमान एक हजार लसीकरण करावे, तसेच नगरपालिका क्षेत्रात पुढील महिनाभरात शंभर टक्के लसीकरण झाले पाहिजे यासाठी नियोजनपूर्वक कामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हा व तालुका टास्क फोर्स यंत्रणेला दिल्या.
 जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीच्या नियामक मंडळाची सभा बुधवारी नियोजन भवन येथे पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
 जिल्हाधिकारी  म्हणाले की, यापूर्वी प्रत्येक तालुक्याला लोकसंख्यानिहाय लस उपलब्ध करून देण्यात येत होती. मात्र, आता झालेल्या वापरानुसार लस साठा पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे लसीच्या वापरावर लससाठा प्राप्त होईल. मोबाइल व्हॅक्सिनेशन व्हॅन तालुकास्तरावर उपलब्ध करून देण्यात आली असून, याद्वारे  लसीकरणासाठी केंद्रावर येऊ न शकणाऱ्या दिव्यांग आणि  आजारी लोकांचे लसीकरण  करण्यासाठी नियोजन करावे.  जिल्हास्तरावर लसीकरणाचा आढावा घेऊन मागे असलेल्या तीन तालुक्यांच्या टास्क फोर्सला यावेळी समज देण्यात येईल. ग्रामीण भागातील सर्वसामान्य महिलांना प्रसूतीकरिता खाजगी दवाखान्यात खर्च पडू नये यासाठी प्रसूतीची सर्व कामे शासकीय दवाखान्यामध्येच करण्यात यावी, याकरिता आवश्यक सोयी- सुविधांची पूर्तता प्रशासनातर्फे करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. स्त्रीरोगतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञ असलेल्या केंद्रात व रुग्णालयात संबंधित रुग्णांची तपासणी त्यांनीच केली पाहिजे, या बाबीवर बाबीवर बारकाईने लक्ष देण्यात यावे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.

जिल्ह्यात आजपासून स्वच्छता मोहीम
- जिल्ह्यात डेंग्यू आजार पसरू नये यासाठी नगरपालिका व ग्रामस्तरावर स्वच्छता मोहीम सुरू करावी, यात नागरिकांनादेखील सहभागी करून घ्यावे. या मोहिमेत डासाची उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे, शौचालाय टाकीच्या पाईपर जाळ्या लावणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, नागरी वस्तीत घाण साठू न देणे, कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छता ठेवणे, कोरडा दिवस पाळणे आदी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. ही स्वच्छता मोहीम उद्यापासूनच २ ऑक्टोबरपर्यंत जिल्हाभर राबवली गेली पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

 

Web Title: Order to complete corona vaccination in the district by November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.