शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
4
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
5
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
6
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
7
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
8
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
9
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
10
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
11
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
12
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
13
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
14
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
15
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
16
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
17
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
18
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
19
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
20
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधाची धुरा विधान परिषदेवर

By admin | Updated: January 11, 2015 22:55 IST

लोकशाही शासन व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांएवढेच किंबहुना त्यापेक्षा अधिक महत्व विरोधकांना असते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानीपत झाल्यानंतर

अंकुशच नाही : प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्षाची भीती यवतमाळ : लोकशाही शासन व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांएवढेच किंबहुना त्यापेक्षा अधिक महत्व विरोधकांना असते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानीपत झाल्यानंतर आता विरोधकाची धुरा विधान परिषद सदस्यांवर येऊन ठेपली आहे. नुकत्याच झालेल्या आमदारांच्या आढावा बैठकीत याचा प्रत्यय प्रकर्षाने दिसून आला. एकेकाळी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणारे विरोधक आता सत्तेत बसले आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सातत्याने प्राबल्य होते. त्यामुळेच विरोधक म्हणून शिवसेना आणि भाजपावर जबाबदारी होती. त्यातही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार संजय राठोड आक्रमक विरोधक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्यासोबत खासदार भावना गवळी, हंसराज अहीर ही मंडळी होती. मात्र आता स्थिती अगदी उलट झाली आहे. आमदार संजय राठोड महसूल राज्यमंत्री झाले. एवढेच नाही तर त्यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आली. त्यांच्या कारभाराचे मूल्यमापन आणि उणिवा दाखविण्यासाठी त्यांच्या इतका सक्षम विरोधक सध्या जिल्ह्यात नाही. भाजपाचे आमदार मदन येरावार वगळता सत्ताधारी सर्वांची पहिलीच वेळ आहे. दीर्घ अनुभवी मनोहरराव नाईक राष्ट्रवादीचे नेतृत्व करतात. मात्र नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी त्यांचीच मदत घेतल्याचे प्रकर्षाने दिसून आले.पुढेही त्यांची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील विधान परिषद सदस्यांवर विरोधकांची भूमिका निभावण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे आमदार माणिकराव ठाकरे, आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग विधान परिषदेत प्रतिनिधीत्व करतात. आमदार माणिकराव ठाकरे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असल्याने ते जिल्ह्यातील समस्यांवर विरोधक म्हणून किती न्याय देऊ शकतात हे सांगता येत नाही. अशा स्थितीत आमदार संदीप बाजोरिया यांच्यावर विरोधकाची जबाबदारी येते. याबाबतीत त्यांचा हातखंड आहे. आपल्या वेगळ्या शैलीत यंत्रणेचा समाचार घेण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. असे असले तरी जिल्ह्यात विरोधकांची उणीव जाणवणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)