शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
3
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
4
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
5
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
6
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
7
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
8
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
10
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
11
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
12
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
13
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
14
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
15
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
16
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
17
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा
18
अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही 
19
रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?
20
झोमॅटो आणि स्विगीच्या ग्राहकांना बसणार फटका? डिलिव्हरी शुल्कावर लागणार नवा कर

जिल्ह्याला केवळ पाच लाख

By admin | Updated: January 7, 2016 02:57 IST

शेतकऱ्यांना खरिपातील मदत म्हणून जाहीर झालेल्या दोन हजार कोटींच्या अर्थसहाय्यात महसूल राज्यमंत्र्यांच्या यवतमाळ या गृहजिल्ह्याला...

शेतकऱ्यांची घोर निराशा : सर्वाधिक आत्महत्या, सर्वात कमी मदत यवतमाळ : शेतकऱ्यांना खरिपातील मदत म्हणून जाहीर झालेल्या दोन हजार कोटींच्या अर्थसहाय्यात महसूल राज्यमंत्र्यांच्या यवतमाळ या गृहजिल्ह्याला केवळ पाच लाख रुपये मिळाले आहे. या तुटपुंज्या मदतीने जिल्ह्यातील सत्ताधारी भाजपाच्या पाचही आमदारांचे युती सरकारमध्ये नेमके किती ‘वजन’ आहे, ही बाबसुद्धा उघड झाली आहे. ज्या महसूल खात्याच्या अहवालावर शेतकऱ्यांना मदत निश्चित होते, त्या खात्याच्या राज्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यालाच अर्थसहाय्यापासून वंचित ठेवले गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. या मदतीने जखमेवर मीठ चोळले गेलेले शेतकरी संतप्त आहेत. शासनाने राज्याच्या २१ जिल्ह्यातील १५ हजार ७४७ गावच्या शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात दोन हजार कोटींचे अर्थसहाय मंजूर केले. त्यात अमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्याला सर्वाधिक १८३ कोटी, अकोला सात कोटी रुपये मिळाले. यवतमाळला मात्र त्यातून केवळ पाच कोटी रुपयांची मदत देण्यात आली. मदतीचा हा आकडा ऐकून शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मदतीचा हा पहिला टप्पा असल्याचे शासकीय यंत्रणा सांगत आहे. मात्र जेव्हा जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची ओरड सुरू होती, त्यावेळी पालकमंत्री मात्र पीक परिस्थिती ‘आलबेल’ दाखविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळेच नजर पीक आणेवारीत केवळ दोन गावात दुष्काळ दाखविला गेला. त्याचाच फटका पहिल्या टप्प्यातील या मदतीत बसल्याचे मानले जाते. सुरुवातीला केवळ दोन गावात दुष्काळ दाखविला गेला आज मात्र संपूर्ण जिल्हाच दुष्काळात असल्याचे सिद्ध झाले. महसूल यंत्रणेच्या नजर व अंतरिम पीक आणेवारीच्या प्रामाणिकतेवर सर्वच घटकांकडून संशय व्यक्त केला जात होता. तो आता संपूर्ण जिल्ह्याची पीक आणेवारी ४६ टक्के आल्याने खरा ठरला आहे. संपूर्ण जिल्हाच दुष्काळात असताना शासनाने मदत वाटपाचे टप्पे पाडून काय साध्य केले असा सवाल केला जात आहे. जिल्ह्यातील खरीप हंगाम बुडाला. सोयाबीन हातचे गेले, कापसाचे पीक अर्ध्यावर आले. आता तुरीला भाव नाही. सुरुवातीला नजर आणेवारीत केवळ दोन गावात दुष्काळ दाखविण्यात आली होती. त्यावर समाजातील सर्वच घटकांकडून तीव्र आक्षेप नोंदविल्यानंतर अंतरिम आणेवारी आठ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून समावेशीत केले गेले. तरीही दुष्काळावरील ओरड कायम असल्याने अखेर ३१ डिसेंबरच्या अंतिम आणेवारीत संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित केला गेला. जिल्ह्याची सरासरी पीक आणेवारी ४६ टक्के आहे. सर्व १६ तालुक्यातील पीक आणेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. खरीप हंगाम हातचा गेल्याने काही शेतकरी रबी हंगामाकडे वळले होते. मात्र त्यांना ओलितासाठी पाणी नाही. कुठे पाणी आहे तर वीज नाही, धरण आहे तर कालवे नाही आणि कालवे आहे तर टेलपर्यंत पाणी पोहोचत नाही, अशी जिल्ह्यातील सिंचनाची एकूण अवस्था आहे. (जिल्हा प्रतिनिधी)