शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्ञाशोध परीक्षेत ९४ हजारपैकी फक्त ७७६ विद्यार्थी पात्र; महाराष्ट्राची पिछेहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:53 IST

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा दहावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. मात्र तब्बल ९४ हजार ५४१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७७६ विद्यार्थी यात पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रीय परीक्षेत लागणार दहावीच्या विद्यार्थ्यांचा कस

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावीची परीक्षा येत्या ३ मार्चपासून आहे. तत्पूर्वी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा दहावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. मात्र तब्बल ९४ हजार ५४१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७७६ विद्यार्थी यात पात्र ठरले आहे. आता मे महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा चांगलाच कस लागणार आहे.दहावीच्या विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधून त्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची मदत देता यावी, याकरिता ही परीक्षा देशपातळीवर घेतली जाते. तत्पूर्वी प्रत्येक राज्याचा कोटा ठरवून राज्यपातळीवर परीक्षा घेऊन त्यातून प्रवर्गनिहाय विद्यार्थी निवडले जातात. त्यानुसार यंदा दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली होती.गुरुवारी राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या निकालानुसार, सर्वसाधारण प्रवर्गातून ३१४, इतर मागास प्रवर्गातून २११, अनुसूचित जाती प्रवर्गातून ११६, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ५८ आणि आर्थिक दुर्बल घटकातून ७७ असे एकंदर ७७६ विद्यार्थी राष्ट्रीय परीक्षेसाठी पात्र ठरले आहे. आता १० मे रोजी एनसीईआरटीतर्फे देशपातळीवरील प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना अकरावी व बारावीसाठी १२५० रुपये तर त्यानंतर पदव्युत्तर पदवी तसेच पीएचडीपर्यंत २००० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी देशभरातून केवळ २००० विद्यार्थी या शिष्यवृत्तीला पात्र ठरले होते. त्यातील २६२ विद्यार्थी महाराष्ट्राचे होते, हे विशेष.यवतमाळला मिळाला भोपळाराज्यस्तरावर झालेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत यवतमाळातील एकही विद्यार्थी पात्र ठरू शकलेला नाही. तर विदर्भातील अकोला, नागपूर, अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी काहीअंशी स्थान मिळविले आहे. त्याचवेळी बुलडाणा जिल्ह्यातील सर्वाधिक ४२ विद्यार्थी देशपातळीवर होणाºया परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. 

टॅग्स :Studentविद्यार्थी