शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

आॅनलाईन एफआयआरने पोलिसांचाच पंचनामा

By admin | Updated: February 25, 2016 02:17 IST

आॅनलाईन एफआयआर पद्धती सोईची आणि वेगवान वाटत असली तरी प्रत्यक्षात या पद्धतीमुळे पोलिसांचाच पंचनामा होण्याची वेळ आली आहे.

‘कनेक्टीव्हीटी’ची समस्या : सिनीअर कर्मचाऱ्यांची तारांबळ, फिर्यादींनाही त्रास, डोकेदुखी वाढलीराजेश निस्ताने यवतमाळ आॅनलाईन एफआयआर पद्धती सोईची आणि वेगवान वाटत असली तरी प्रत्यक्षात या पद्धतीमुळे पोलिसांचाच पंचनामा होण्याची वेळ आली आहे. आॅनलाईन एफआयआरमध्ये पोलिसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातून फिर्यादी पक्षामध्ये पोलिसांप्रती अविश्वासाची भावना वाढीस लागताना दिसत आहे. नवीन वर्षापासून आॅनलाईन ‘एफआयआर’ नोंदविणे सुरू झाले. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी हा बदल स्वीकारला आहे. तेथील परंपरागत स्टेशन डायरी बाद झाली असून त्याची जागा आता संगणकाने घेतली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याला चार संगणक देण्यात आले आहे. परंतु तेथे संगणक प्रशिक्षित पोलीस कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. खात्यात नव्याने दाखल झालेल्या तरुणांना काही प्रमाणात का होईना संगणकाचे ज्ञान आहे. परंतु सेवा ज्येष्ठ झालेल्या जमादार आणि सहायक फौजदारांना एवढेच काय खात्यांतर्गत पदोन्नतीने फौजदार झालेल्यांचा संगणकाशी कधीच दुरान्वये संबंध आला नसल्याचे त्यांची होणारी कसरत पाहून लक्षात येते. वास्तविक पाच-सात वर्षांपूर्वी संगणक प्रशिक्षण सक्तीचे झाले असताना या सर्व सिनीअर पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. तशी नोंद पोलीस दप्तरी असून त्याचा विशेष खर्चही शासनाकडून झाला. संगणक प्रशिक्षणाचे सर्टिफिकेट असूनही या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात संगणकाचे ज्ञान नाही. अनेक कर्मचाऱ्यांनी त्यावेळी केवळ सर्टिफिकेट मिळविल्याचेही सांगितले जाते. त्याचा त्रास त्यांना आज आॅनलाईन ‘एफआयआर’ नोंदविताना सहन करावा लागत आहे. ड्युटी आॅफिसर म्हणून किंवा तपास अधिकारी म्हणून या सिनीअर पोलीस कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी आहे. मात्र त्यांनाच संगणक येत नाही. अशा वेळी खात्यातील संगणकाचे ज्ञान असलेल्या तरुणांना हाताशी ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.मुळात आॅनलाईन ‘एफआयआर’च्या तांत्रिक अडचणीही अनेक आहेत. पोलिसांनी कोणत्याही संगणकात सहज उपलब्ध होणाऱ्या की-बोर्डवर प्रशिक्षण घेतले आहे. परंतु पोलीस ठाण्यांमधील संगणकात ‘मंगल’ हा खास की-बोर्ड आहे. त्याच्याशी पोलिसांचा कधी संबंधच आला नाही. त्यामुळे मॅटर कंपोज करताना पोलिसांची अडचण होत आहे. पोलिसांच्या नियमित की-बोर्डमध्ये ‘ध’ लिहिला तर ‘मंगल’मध्ये तो ‘फ’ होत असल्याने गोंधळ उडतो आहे. आॅनलाईन ‘एफआयआर’साठी कनेक्टीव्हीटी मिळत नाही. टायपिंग करताना एरर येतो. त्यामुळे मशीन हँग होते. डाटा सेव्ह राहत नाही. कॉम्प्युटर रिस्टार्ट करावे लागत असल्याने डाटा उडतो. पुन्हा शून्यापासून सुरूवात करावी लागते. त्यात पोलिसांचा वेळ वाया जातो. डाटा फॉरवर्ड करण्याची व्यवस्था संगणकात नाही. अशा वेळी फिर्याद देण्यासाठी आलेल्या व्यक्तींना एक तर कनेक्टीव्हीटी मिळेपर्यंत थांबवावे लागते किंवा त्याला काही वेळाने बोलवावे लागते. अनेकदा साध्या कागदावर त्याची फिर्याद नोंदवून घेतली जाते. यातूनच पोलिसांप्रती ‘गुन्हे दडपले जात असल्याची, फिर्याद घेत नसल्याची’ भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. मुळात आॅनलाईन पद्धतीने काम करण्याची सिनीअर पोलिसांची अद्यापही मानसिकता बनलेली नाही. कित्येक पोलीस कर्मचारी फिर्याद, पंचनामा, साक्ष, पुरावे, दोषारोपपत्र याच्या लिखाण कामात अगदी एक्सपर्ट आहेत. परंतु हेच कर्मचारी संगणकापुढे बसताच ‘झिरो’ ठरतात. त्यामुळे हे कर्मचारी संगणकापुढे बसण्याची हिंमतच दाखवित नाही. भारनियमनामुळे संगणकाला वीज पुरवठ्याचाही सामना करावा लागतो. यासाठी बॅकअप व जनरेटरची व्यवस्था असली तरी अनेकदा तीसुद्धा कुचकामी ठरत असल्याचा अनुभव आहे. कंपनीच्या सेवेबाबत तक्रार पोलीस दलात विप्रो कंपनीच्या संगणकाचा पुरवठा करण्यात आला आहे. या संगणकात बिघाड झाल्यास देखभाल दुरुस्तीसाठी दोन-तीन पोलीस ठाण्यांमिळून एक कर्मचारी नियुक्त केला गेला आहे. परंतु तो योग्य पद्धतीने आणि तत्काळ सेवा देत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे एफआयआर व अन्य कामांचा खोळंबा होतो. यवतमाळ शहर पोलीस ठाण्यातील संगणक बंद आहे. दोन दिवसांपासून सतत संपर्क करुनही दुरुस्ती करणाऱ्याचा पत्ता नसल्याची हतबलता पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. या आॅनलाईन एफआयआरमुळे पोलीसच नव्हे तर नागरिकांनाही प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. आधीच एफआयआर नोंदविण्याची नागरिकांची मानसिकता नाही. आॅनलाईनमुळे तासन्तास पोलीस ठाण्यात ताटकळत बसावे लागत असल्याने घटना घडूनही फिर्याद न देणाऱ्यांची संख्या गेल्या दोन महिन्यात चांगलीच वाढली आहे.