लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : इतर ठिकाणावरून आयात झालेला कांदा, लसूण आणि आलूचे दर तेज आहेत. तर रबीच्या हंगामात जिल्ह्यातील भाजीपाला क्षेत्रात लागवड वाढली. त्याचा परिणाम थेट उत्पादनावर झाला आहे. भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. यामुळे जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यात यावर्षी टमाटर, कोबी, पालक, मेथी आणि वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. हा भाजीपाला बाजारात आला आहे. एकाच वेळी मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आवक झाली. यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. याचा फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे.टमाटर उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. बाजारात विक्रीकरिता येणाऱ्या टमाटरला मजुरीचे पैसे निघणेही अवघड आहे. १० रूपयात दोन किलो टमाटर बाजारात विक ले जात आहे. कॅरेटला २० ते ५० रूपयांचाच दर मिळत आहे. मजुरीचे दर मात्र शंभर ते सव्वाशे रुपये आहे. यामुळे टमाटर उत्पादक शेतकरी हैराण झाले आहे.अशीच अवस्था वांग्याची आहे. मागणीच्या तुलनेत वांग्यांची आवक वाढली आहे. ५० रूपयाला २० किलो वांग्याची पन्नी विकली जात आहे. कोथिंबीरीचे दरही असेच पडले आहेत. यामुळे बेभाव भाजीपाला विकला जात आहे. एक कट्टा कोबी केवळ ८० ते १०० रूपयाला विकली जात आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आहे आहे.आयातीचा परिणामकांदा, लसूृण आणि आलू बाजारात सर्वाधिक तेज आहे. विशेष म्हणजे त्यांची इतर ठिकाणावरून आयात करण्यात आली आहे. कांदा ५० रूपये किलोने विकला जात आहे. लसूण २०० रूपये किलो, तर आलू ३० रूपये कि लोच्या घरात आहे.
कांदा, लसूण आणि आलू अजूनही तेजच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST
टमाटर उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. बाजारात विक्रीकरिता येणाऱ्या टमाटरला मजुरीचे पैसे निघणेही अवघड आहे. १० रूपयात दोन किलो टमाटर बाजारात विक ले जात आहे. कॅरेटला २० ते ५० रूपयांचाच दर मिळत आहे. मजुरीचे दर मात्र शंभर ते सव्वाशे रुपये आहे. यामुळे टमाटर उत्पादक शेतकरी हैराण झाले आहे.
कांदा, लसूण आणि आलू अजूनही तेजच
ठळक मुद्देभाजीपाला मात्र घसरला : शेतकरी पेचात