शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
4
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
5
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
6
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
7
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
8
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
9
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
10
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
11
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
12
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
13
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
14
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
15
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
16
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
17
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
18
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
19
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

एक हजार शेतकऱ्यांची सावकारी कर्जातून मुक्तता

By admin | Updated: August 1, 2016 00:49 IST

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले संपूर्ण कर्ज शासनामार्फत भरण्याचा ऐतिहासिक निर्णय २०१४च्या हिवाळी ...

सव्वा कोटींचा दिलासा : जिल्हास्तरीय समितीकडून आदेश पारित यवतमाळ : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले संपूर्ण कर्ज शासनामार्फत भरण्याचा ऐतिहासिक निर्णय २०१४च्या हिवाळी अधिवेशनात घेण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा निबंधक यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावापैकी एक कोटी १४ लाख रूपयांचे आदेश पारीत करण्यात आले आहे. यामुळे १०८७ शेतकऱ्यांचे कर्ज माफ होऊन त्यांची सावकारी कर्जातून शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे. त्यासोबतच सावकराकडे असलेले तारणही परत मिळणार आहे. नोंदणीकृत सावकाराकडून शेतकऱ्यांनी घेतलेले संपूर्ण कर्ज आणि त्यावरील व्याज या योजनेंतर्गत सावकारास अदा करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार रक्कम वितरीत करण्याची कार्यवाही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांचे सावकारांकडे असलेले तारण परत करण्यात येऊन सावकाराकडून त्यासंबंधीचे हमीपत्र सादर करावे लागत आहे. जिल्ह्यातील १०१ परवानाधारक सावकारापैकी ९१ सावकारांनी सात हजार ५७६ शेतकऱ्यांचे सहा कोटी ४१ लाख ३२ हजाराचे प्रस्ताव सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे दाखल केले आहे. यापैकी तालुकास्तरीय समितीने ५० सावकारांकडील एक हजार ९३ शेतकऱ्यांचे एक कोटी १७ लाख ४ हजार रूपयांचे प्रस्ताव मंजूर करून जिल्हास्तरीय समितीकडे पाठविले. जिल्हास्तरीय समितीने यापैकी एक हजार ८७ सभासदांच्या एक कोटी १८ लाख २१ हजार रूपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली. जिल्ह्यामध्ये १ कोटी १८ लाख ४९ हजार ६४२ रुपये जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेले असले तरी शासनाकडून एक कोटी १५ लाख रुपये प्राप्त झाले आहे. त्यानुसार एक कोटी १४ लाख ७५ हजार ८८२ रूपयांचे आदेश पारीत करण्यात आले. उर्वरित कर्ज माफ करण्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी) तारण परत मिळणार जिल्ह्यात सावकारी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करण्यात आली असून सावकारी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यांनी गहाण ठेवलेल्या वस्तू त्यांना परत करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच सावकारांचे सहायक निबंधक यांच्याकडून कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे. सुरवातीला या योजनेत सावकाराने परवाना क्षेत्राबाहेरील शेतकऱ्यास कर्ज दिले असल्यास ते या योजनेस पात्र ठरविण्यात आले नव्हते. मात्र शासनाने ही अटही शिथिल करून सरसकट सर्वच सावकारी कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाही लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होत आहे.