लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : नागपूर मार्गावरील चापर्डा बसस्थाकाजवळ दुपारी १ वाजता शिवशाही बस आणि मेटॅडोअरमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात मेटॅडोअर चालक जागीच ठार झाला तर बस चालकासह १५ प्रवासी जखमी झाले. मृतकाचे नाव शंकर आलट (४५) रा.चाकूर जि. लातूर असे आहे.शिवशाही बस क्रमांक एमएच २९-बीई १०६४ ही प्रवासी घेऊन यवतमाळवरून नागपूरकडे जात होती. दरम्यान विरुद्ध दिशेने मेटॅडोअर (क्रमांक एमएच २४-जे६०६३) यांच्यात धडक झाली. चौपदरी रस्त्याच्या एका बाजूचे काम सुरू असल्याने चापर्डा गावाजवळ एकेरी वाहतूक सुरू होती. यामुळेच भरधाव असणाऱ्या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली.या अपघातातील जखमींना तातडीने उपचारार्थ यवतमाळकडे रवाना करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कळंबचे ठाणेदार विजय राठोड आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर मृताला कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघाताची पोलिसांनी नोंद घेतली असून अधिक तपास सुरू आहे. नागपूर मार्ग चौपदरी झाल्याने येथील किरकोळ अपघात कमी झाले. मात्र गंभीर अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोकळा रस्ता दिसत असल्याने वाहनांचा स्पीड सुसाट आहे.
शिवशाही-मेटॅडोअर अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST
शिवशाही बस क्रमांक एमएच २९-बीई १०६४ ही प्रवासी घेऊन यवतमाळवरून नागपूरकडे जात होती. दरम्यान विरुद्ध दिशेने मेटॅडोअर (क्रमांक एमएच २४-जे६०६३) यांच्यात धडक झाली. चौपदरी रस्त्याच्या एका बाजूचे काम सुरू असल्याने चापर्डा गावाजवळ एकेरी वाहतूक सुरू होती. यामुळेच भरधाव असणाऱ्या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली.
शिवशाही-मेटॅडोअर अपघातात एक ठार
ठळक मुद्देनागपूर मार्गावर चापर्डाची घटना : बस चालकासह १५ प्रवासी जखमी