शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकीची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 11:57 IST

एसटी महामंडळाने काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. परिणामी एसटीचे दररोज २३ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.

ठळक मुद्देकामगार संघटनेचा प्रयत्ननियमित व पूर्ण पगार, सक्तीच्या रजेचाही प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘कोविड-१९’ च्या काळातच एसटी कर्मचाऱ्यांवर अनेक आघात केले जात आहे. वेतनाला कात्री त्यातही अनियमितता, सक्तीची रजा, सेवा खंडित, स्वेच्छा निवृत्ती, असे अनेक वार कर्मचाऱ्यांवर बसत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी व्रजमूठ गरजेची असल्याची जाणीव झाल्याने तसे प्रयत्न केले जात आहे.एसटी महामंडळाने काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. परिणामी एसटीचे दररोज २३ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. बसफेऱ्या चालविणे, कर्मचाऱ्यांचा पगार करणे, कार्यालयीन खर्च यासाठी लागणारा पैसा उभा होणे कठीण झाले आहे. मार्च पेड इन एप्रिलच्या पगारापासूनच कर्मचाऱ्यांच्या वेतनाला घरघर लागली आहे. जून पेड इन जुलैचा पगार अजूनही झालेला नाही.

पैसा वाचविण्यासाठी एसटीकडून वेगवेगळे फंडे वापरले जात आहे. रोजंदार गट-१ मधील जवळपास चार हजार ५०० कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरती खंडित करण्यात आली आहे. नव्यानेच सेवेत रुजू झालेल्या या कर्मचाऱ्यांना कोटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात अडचणी येत आहे. काम नाही तर दाम नाही, या एसटीच्या धोरणाचे ते बळी ठरले आहे.कर्मचारी कामगिरी करण्यास तयार असताना त्यांना सक्तीची रजा दिली जात आहे. यातही आर्थिक नुकसान होण्याची भीती कामगारांना आहे. परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून ही रजा लादली जात असल्याचा आरोप होत आहे. २७ हजार कामगारांना स्वेच्छा निवृत्ती देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. स्वेच्छा निवृत्ती ऐच्छिक असावी, सक्ती नसावी. तसे झाल्यास कामगार करारातील तदतुदीचा भंग ठरेल, असे सांगितले जाते.कामगारांचे अहित असल्याने महामंडळाने आपली भूमिका बदलवावी, यासाठी वेगवेगळ्या संघटनांनी आपापल्या पातळीवर हातपाय हालवले. मात्र महामंडळावर त्याचा कुठलाही असर झाला नाही. म्हणून आता सर्वांनी एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही, याची उपरती झाली. कामगार संघटनेने एक पाऊल पुढे टाकत सर्व संघटनाच्या नेत्यांशी संपर्क साधला जात आहे. संघटनेचे जनरल सेके्रटरी हनुमंत ताटे, केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी महामंडळातील सर्व कामगार संघटनांना एक होण्याचे आवाहन केले आहे.आता लढाई निकराचीसर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या पवित्र उद्देशाने संघटनेने उचललेले हे पाऊल आहे. आता लढाई निकराची आहे. सर्वांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. यादृष्टीने संघटनांशी संपर्क केला जात आहे. सर्व संमतीने येत्या काही दिवसात व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली जाईल, असे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :state transportएसटी