शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

दीडशे ‘टॉप’ थकबाकीदार निशाण्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 05:00 IST

बुधवारी ११.३० वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी एम.डी. सिंह जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयाला भेट देणार आहे. यावेळी विविध बाबींचा आढावा घेऊन कामकाज आणखी चांगल्या पद्धतीने चालविण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना टीप्स् देणार आहेत. कर्जासाठी शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये हा मुख्य उद्देश डोळ्यापुढे ठेवला जाणार आहे. त्याच वेळी दिलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहे.

ठळक मुद्दे६५० कोटी बुडित कर्ज : जिल्हाधिकारी आज जिल्हा बँकेत धडकणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ६५० कोटी रुपये कर्ज बुडित असून यातील ‘बीगबजेट’ टॉप दीडशे थकबाकीदार जिल्हाधिकाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान त्यांच्यावरील कारवाईची दिशा निश्चित करण्यासाठी बुधवारी बँकेचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी एम.डी. सिंह जिल्हा बँकेत धडकणार आहेत.बुधवारी ११.३० वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी एम.डी. सिंह जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयाला भेट देणार आहे. यावेळी विविध बाबींचा आढावा घेऊन कामकाज आणखी चांगल्या पद्धतीने चालविण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना टीप्स् देणार आहेत. कर्जासाठी शेतकºयांना कोणताही त्रास होऊ नये हा मुख्य उद्देश डोळ्यापुढे ठेवला जाणार आहे. त्याच वेळी दिलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहे.बँकेचे ६५० कोटी कर्ज बुडित (एनपीए) आहे. त्यातील मोठ्या दीडशे थकबाकीदारांची नावे वेगळी काढण्यात आली. वसुलीसाठी जप्ती व पुढील कारवाईवर फोकस निर्माण केला जाणार आहे. कोर्ट-कचेरी सुरू असलेल्या प्रकरणात न्यायालयात बँकेची बाजू भक्कमपणे मांडली जाणार आहे.तारणाच्या चक्क दुप्पट कर्ज !काही कर्ज राजकीय दबावाने तर काही तारणाच्या दुप्पट दिले गेले आहे. तारण संपत्ती विकूनही कर्जाची रक्कम वसूल होत नाही. कित्येक प्रकरणात धाक दाखवून कर्ज मंजूर करून घेतले आहे. काही प्रकरणे संचालकांच्या मौखिक शिफारसीवरून मंजूर केली गेली आहे. अनेक कर्ज संचालकांच्या परिवारातील संस्था, सदस्यांनाही दिले गेल्याचे सांगण्यात येते. जिल्हाधिकारी आता या ६५० कोटींच्या बुडित कर्जाच्या वसुलीसाठी काय भूमिका घेतात याकडे नजरा आहेत.साखर कारखाना, जिनिंग, पतसंस्था, मिलचा समावेशया दीडशे थकबाकीदारांमध्ये वसंत सहकारी साखर कारखाना, सर्वसेवा व्यापारी संकुल, नागरी पतसंस्था, यवतमाळ, आर्णी, महागाव, दारव्हा तालुक्यातील जिनिंग, नेर तालुक्यातील ऑईलमिल आदींचा समावेश आहे. या टॉपटेन दीडशेसह विविध कर्जदारांना दिलेले कर्ज हे तारणाच्या दुप्पट आहे. त्यामुळे या कर्जाच्या पूर्ण वसुलीची शक्यता नाही. त्याचा फटका बँकेला बसणार आहे.

टॅग्स :bankबँक