शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

वृद्धाश्रमातील आईबाबांना लाभले यवतमाळातील मुलांचे अपूर्व प्रेम

By admin | Updated: November 5, 2016 01:36 IST

आयुष्याची सायंकाळ अगदीच एकाकी. वृद्धाश्रमाच्या छताखाली ते तसे सुरक्षितच जगतात. तरी सामाजिक-कौटुंबिक जीवनाला ते पारखे झाले आहेत,

आगळी दिवाळी : उमरी पठारच्या वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचा हृद्य सत्कारयवतमाळ : आयुष्याची सायंकाळ अगदीच एकाकी. वृद्धाश्रमाच्या छताखाली ते तसे सुरक्षितच जगतात. तरी सामाजिक-कौटुंबिक जीवनाला ते पारखे झाले आहेत, अशा ४८ वृद्धांच्या जीवनात शुक्रवारी अनपेक्षितपणे पारिवारिक दिवाळी अवतरली. मुला-सुनांनी त्यांचे औक्षण केले. कुंकवाचा टिळा लावला. खांद्यावर शाल पांघरली अन् नतमस्तकही झाले. रक्ताचे नाते नसूनही आपल्यासाठी आनंदाचा मांडव घालणाऱ्या या लेकरांना सत्कारमूर्ती आईवडिलांनीही मनापासून आशीर्वाद दिले... सख्ख्या मुलांनी टाकून दिलेल्या वृद्धाश्रमातल्या आईवडीलांसाठी यवतमाळ शहरातील अनेक मान्यवर पोटच्या पोरांसारखे धावले, झुकले, वाकले आणि आशीर्वादाचे दान भरून पावले. आर्णी तालुक्यातील उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रम निराश्रीत ज्येष्ठांसाठी घर बनला आहे. या वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत शुक्रवारी महेश भवनात आगळी दिवाळी साजरी करण्यात आली. ‘एक दिवस वृद्धांच्या सहवासात’ अशा नावाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रणही ‘आई वडीलांच्या सावलीत दिवाळी साजरी करुया’ अशा शब्दात देण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ११ वाजता शहरातील संवेदनशील माणसांनी महेश भवनात एकच गर्दी केली होती. भवनाच्या दारातच सुंदर रांगोळी रेखाटून सर्वांचे स्वागत करण्यात आले. वृद्धांना अतिशय सन्मानाने सभागृहात आणून स्थानापन्न करण्यात आले. थकलेले शरीर साथ देत नसले तरी प्रत्येक वृद्ध आगळ्या उत्साहाने आपला सन्मान अनुभवत होता. (स्थानिक प्रतिनिधी)वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची यवतमाळात पारिवारिक दिवाळीयवतमाळ : उमरी पठार येथील (ता. आर्णी) वृद्धाश्रमात रोजच वृद्धांची काळजी घेतली जाते. पण तरीही त्यांना समाजातील तरुणांकडून आम्हीही तुमच्या सोबत आहोत, हा दिलासा मिळण्याची गरज आहे. हीच गरज लक्षात घेऊन शहरातील संवेदनशील नागरिकांनी या वृद्धांसाठी ‘एक दिवस वृद्धांच्या सहवासात’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. दिवाळीत वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेण्याची भारतीय संस्कृती आहे. तीच संस्कृती या कार्यक्रमात झळकली.कार्यक्रमाची औपचारिक सुरूवात झाल्यावर मुख्य सोहळा सुरू झाला. तीन-तीनच्या गटाने वृद्धांना मंचावर आणले गेले. वृद्धाश्रमात अहोरात्र मेहनत घेणारे राजू जयस्वाल तत्परतेने संबंधित वृद्धांना मंचावर आणत होते. त्यानंतर उद्घोषणा होताच प्रेक्षकातील मान्यवर सपत्नीक पुढे जाऊन वृद्धांचा सन्मान करीत होते. यवतमाळातील नामवंत डॉक्टर विविध व्यावसायिक वृद्धांची मुलेच बनले होते. त्यांनी पत्नीसह वृद्धांच्या पायावर झुकून त्यांची माया अनुभवली. काही वृद्धांना जाग्याहून उठणे शक्य नव्हते. त्यांच्याजवळ जाऊन सत्कार करण्यात आला. यवतमाळकरांचे हे सौजन्य अन् जिव्हाळा पाहून वृद्धाश्रमवासी आईबाबांचे हृदय गलबलून गेले. त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले. यावेळी नंदलाल बागडी, वृद्धाश्रमाचे संस्थापक शेषराव डोंगरे, डॉ. प्रकाश नंदूरकर, किशोर दर्डा, अन्वरभाई लोधा, रमेश मुणोत, अरुणभाई पोबारू आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. संत दोला महाराज वृद्धाश्रमांच्या माध्यमातून वृद्धांना आधार देणारे शेषराव डोंगरे, वृद्धांसाठी २४ तास सेवा देणारे राजू जयस्वाल, गुणवंत डहाके, वत्सलाबाई शेरे, दत्ता शेरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जयंत नंदापुरे, तर सूत्रसंचालन कमल बागडी यांनी केले. डॉ. माणिक मेहरे यांच्या पसायदानाने सत्कार सोहळ्याची सांगता झाली. (स्थानिक प्रतिनिधी)आईबाबांसाठी शाही पंगत!सत्कारानंतर वृद्धाश्रमातील ज्येष्ठ मंडळींसाठी खास जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. एकता महिला भजन मंडळाने ही संपूर्ण व्यवस्था सांभाळली. नक्षीदार आसने, चंदेरी चौरंगावर सुग्रास जेवणाचे ताट असा या जेवणावळीचा थाट होता. उमरी पठार वृद्धाश्रम मित्र परिवाराच्या सदस्यांनी प्रत्येक वृद्धाला आपुलकीने हात धरून जेवणासाठी आणले. पुरुषांसह महिलांनीही अत्यंत आग्रहपूर्वक पंगतीत वाढण करीत ‘आईबाबांना’ जेवू घातले. भरलेल्या ताटा इतकेच वृद्धांचे मनही आनंदाने भरून गेले होते.चित्रफितीची नवलाईउमरी पठारच्या वृद्धाश्रमाबाबत आनंद कसंबे यांनी तयार केलेली चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. आपलेच जगणे आणि आपलेच रूप पडद्यावर पाहून वृद्धांच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसली. सुरकुत्यांनी भरलेले चेहरे आनंदाने उजळून निघाले. गेल्या २५ वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या या वृद्धाश्रमापुढे आर्थिक अडचणी वारंवार निर्माण होत आहेत. त्यामुळे समाजातील दानशूरांनी वृद्धांसाठी सढळ हाताने मदत द्यावी, असे आवाहन या चित्रफितीद्वारे वृद्धाश्रमाचे संस्थापक शेषराव डोंगरे, अध्यक्ष डॉ. सुरेश राठी, संचालन जयंत नंदापुरे यांनी केले. सत्कारातही सौजन्यआपल्या आप्तांच्या तेरवीचा खर्च टाळून वृद्धाश्रमाला दान देणारे दारव्ह्याचे संजय दुधे यांचा विशेष सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. वृद्धाश्रमाचे संस्थापक शेषराव डोंगरे सत्कार करण्यासाठी उभे झाले, तेव्हा दुधे यांनी डोंगरेंचाच सत्कार करण्याचा आग्रह धरला. मात्र डोंगरे यांनी आपुलकीच्या हक्काने दुधे यांच्या खांद्यावर शाल पांघरली. तेव्हा दुधे यांनी डोंगरेंच्या पायाला स्पर्श करत लगेच आपल्या खांद्यावरची शाल डोंगरेंच्या खांद्यावर पांघरून आपलाही हट्ट पूर्ण केला. समाजासाठी विचार करणाऱ्या दोन माणसांचे हे सौजन्य उपस्थितांना अचंबित करून गेले. विविध सामाजिक कार्यात पुढाकार घेतल्याबद्दल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पंकज नानवाणी यांच्यासह त्यांच्या चमूचाही सत्कार करण्यात आला.