शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा ! टायपिंग, शाॅर्टहॅन्डचा कोर्स आता मोफत! राज्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ

By अविनाश साबापुरे | Updated: June 23, 2024 19:48 IST

सध्या ही योजना अमृत संस्थेच्या माध्यमातून खुल्या गटातील उमेदवारांसाठी लागू करण्यात आली आहे...

यवतमाळ : विविध नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या संगणक टायपिंग अभ्यासक्रमासह शाॅर्टहॅन्डचाही संपूर्ण कोर्स आता मोफत शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून हा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण अर्थसहाय्य दिले जाणार आहे. याबाबत अमृत संस्थेची करार करण्यात आला असून लवकरच सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांशीही करार केला जाणार आहे.

सध्या ही योजना अमृत संस्थेच्या माध्यमातून खुल्या गटातील उमेदवारांसाठी लागू करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना टंकलेखन आणि ऑनलाईन लघुलेखन अभ्यासक्रमासाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य दिले जाणार आहे. ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था, महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी, युवक, युवतींना हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. मात्र लवकरच सारथी, महाज्योती, बार्टी, तसेच आदिवासी संशोधन संस्थेशीही करार करुन विविध मागास घटकातील विद्यार्थ्यांनाही हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे."

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (जीसीसी-टीबीसी) तसेच ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यात कोर्सचा संपूर्ण खर्च विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. याबाबत परीक्षा परिषद आणि अमृत संस्थेमध्ये करारनामा करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या जूनच्या परीक्षेमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनासुद्धा ही मदत मिळणार आहे. टायपिंग व शाॅर्टहॅन्ड परीक्षेत दरवर्षी उत्तीर्ण होणाऱ्या दीड लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.

उमेदवार संबंधित परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संपूर्ण कोर्सचा खर्च त्याला दिला जाणार आहे. अमृत संस्थेचे व्यवस्थापक विनय जोशी यांच्याशी करार झाला आहे. सध्या खुल्या गटातील आर्थिक दुर्बलांना याचा लाभ होईल. मात्र सारथी, महाज्योती, बार्टी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेशीही करार करण्याचा प्रयत्न आहे. मी स्वत: त्यांच्या संचालकांशी यादृष्टीने चर्चा केली आहे. दुसऱ्या टप्प्यात या संस्थांशी करार झाल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे.- डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

कुणाला किती अर्थसहाय्य मिळणार?- टायपिंगसाठी ६,५०० : जीसीसी-टीबीसी उत्तीर्ण विद्यार्थ्याला सहा महिन्यांचे कोर्स शुल्क ४८००, प्रवेश शुल्क २००, परीक्षा शुल्क १०००, सामुग्री शुल्क ५०० असे एकरकमी सहा हजार ५०० रुपये मिळतील.- शाॅर्टहॅन्डसाठी ५,३०० : लघुलेखन कोर्स उत्तीर्ण विद्यार्थ्याला सहा महिन्यांचे कोर्स शुल्क ३६००, प्रवेश शुल्क २००, परीक्षा शुल्क १०००, सामुग्री शुल्क ५०० असे एकरकमी पाच हजार ३०० रुपये मिळतील.

निकष काय?- उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.- जीसीसी-टीबीसी परीक्षा उत्तीर्ण असावा.- लघुलेखन कोर्स पूर्ण करून उत्तीर्ण असावा.- पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात हे अर्थसहाय्य जमा होईल.- त्यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर कागदपत्रांसह अर्ज करावा लागेल. 

टॅग्स :Educationशिक्षण