शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक उपक्रमांचा आता अधिकृत ‘सोशल’ धमाका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:33 IST

विद्या प्राधिकरण स्वत:चे फेसबुक पेज, ट्विटर अकाउंट आणि यूट्यूब चॅनलही सुरू करणार असून राज्य शासनाने त्यासाठी परवानगीही दिली आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाची परवानगीफेसबुक पेज, ट्विटर अकाऊंट, यूट्यूब चॅनलही येणार

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान राबविताना शिक्षण विभागाने गेल्या पाच वर्षांत उपक्रमांची अक्षरश: चळतच मांडली आहे. हे उपक्रम गावोगावच्या शिक्षकांपर्यंत पोहचविताना विद्या प्राधिकरणाला मेहनतही घ्यावी लागली; मात्र आता हेच उपक्रम महाराष्ट्रातल्या कोणत्याही शिक्षकाला घरबसल्या समजून घेता येतील. कारण त्यासाठी विद्या प्राधिकरण स्वत:चे फेसबुक पेज, ट्विटर अकाउंट आणि यूट्यूब चॅनलही सुरू करणार असून राज्य शासनाने त्यासाठी परवानगीही दिली आहे.आतापर्यंत शिक्षक वैयक्तिक पातळीवर सोशल मीडियात आपापले ग्रुप तयार करून शैक्षणिक उपक्रमांची आदान-प्रदान करीत आहेत, मात्र त्यात अनेकांना ‘खात्री’ वाटत नाही. एका शिक्षकाने दुसऱ्यापर्यंत पोहोचविलेला उपक्रम कितपत खरा याबाबत अनेकांच्या मनात साशंकता होती.मात्र आता विद्या प्राधिकरणाचे सर्व उपक्रम, अभ्यासक्रमांशी संबंधित माहिती, शिक्षकांची प्रशिक्षणे, परिपत्रके एकाच अधिकृत ‘चॅनल’द्वारे उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे सोशल मीडियात सध्या शिक्षकांनी चालविलेला उपक्रमांचा धमाका यापुढे अधिकृत सोशल अकाउंटवर उपलब्ध होणार आहे.राज्य शासनाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी गुरूवारी यासंदर्भातील अध्यादेश निर्गमित केला आहे. यासाठी कोणताही निधी मंजूर केला जाणार नाही, या अटीवर शासनाने विद्या प्राधिकरणाला अधिकृत सोशल मीडिया अकाउंट उघडण्यास परवानगी दिली आहे.प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र चॅनेलजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) माध्यमातून जिल्हाभरातील शाळांमधील उपक्रमांचे नियमन केले जाते. शिक्षकांची प्रशिक्षणेही डायटच राबवित असते. त्यामुळे आता प्रत्येक जिल्हा स्तरावरील ‘डायट’लाही स्वत:चे यूट्यूब चॅनेल सुरू करण्यासाठी शासनाची परवानगी मिळाली आहे. त्या माध्यमातून गावोगावी न पोहचता किंवा शिक्षकांना जिल्हास्तरावर न बोलवताही डायटच्या उपक्रमांचा प्रसार करणे शक्य होणार आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया