शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

पदाधिकारी हायटेक योजना मात्र रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 21:17 IST

येथील पंचायत समितीचे पदाधिकारी हायटेक झाले. मात्र ग्रामीण भागात योजना रखडल्या आहे. बहुतांश योजना बारगळत असून चौदाव्या वित्त आयोगाचे तब्बल ११ कोटी रूपये अद्याप पडून आहेत.

ठळक मुद्देमहागाव तालुका : १४ वित्त आयोगाचे ११ कोटी पडूनच

संजय भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : येथील पंचायत समितीचे पदाधिकारी हायटेक झाले. मात्र ग्रामीण भागात योजना रखडल्या आहे. बहुतांश योजना बारगळत असून चौदाव्या वित्त आयोगाचे तब्बल ११ कोटी रूपये अद्याप पडून आहेत.पंचायत समितीचे पदाधिकारी आधुनिकतेच्या काळात चांगलेच हायटेक झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय सभापती अधूनमधून मुंबईच्या येरझारा मारतात. त्यामुळे त्यांना सतत नवीन माहिती मिळते. उपसभापती पुसदचे रहिवासी झाले आहेत. त्यामुळे तालुक्यात घरकुल, शौचालय बांधकाम रखडले आहे. शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा योजना रेंगाळल्या आहे. बालमृत्यू, गरोदर माता मृत्यू आदी महत्वाच्या विषयांची योग्य अंमलबजावणी संथ झाली आहे. अपवाद वगळता झालेल्या कामात प्रचंड अनियमितता झाल्याच्या डझनभर तक्रारी प्राप्त असूनही कारवाईवर सभागृहात चर्चा करायला पदाधिकाºयांना वेळच नाही.यापूर्वी कधीकाळी रात्रीचे दहा वाजतापर्यंत चालणारी पंचायत समितीची मासिक सभा सध्या तास दोन तासांत उरकते. त्यावरून सामान्य नागरिकांच्या समस्यांविषयी लोकप्रतिनिधी किती जागृत आणि गंभीर आहेत, याचा अंदाज येतो. धनोडा, भांब, वनोली, खडका आदी ग्रामपंचायतींमधील बळीराज्या चेतना अभियान व अन्य योजनेतील अपहार आणि अनियमिततेचे प्रकरण समोर आले आहे. त्याअनुषंगाने ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र बहुतांश ग्रामपंचायतींच्या सचिवांना कारवाईपासून दूरच ठेवले गेले.दूषित पाण्यामुळे तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कामचुकार २१ ग्रामसेवकांना शोकॉज नोटीस बजावण्यात आली. मात्र त्यापुढे कारवाई सरकली नाही. ग्रामपंचायत स्तरावर शासन राबवित असलेल्या योजनांची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी यंत्रणा आहे. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी गटविकास अधिकारी आहे. मात्र सदस्यांचे अज्ञान व सभापती, उपसभापतींच्या सततच्या गैरहजेरीने स्थानिक प्रशासन सुसाट झाले आहे. त्यांच्यावर कुणाचाच वचक नसल्याने अधिकारी, कर्मचारी चांगलेच निर्ढावले आहेत.साडेतीन कोटींचे रस्ते खचलेदलित वस्ती, तांडा वस्तीमध्ये साडेतीन कोटी रुपये खर्चून सिमेंट रस्ते बांधण्यात आले. मात्र ते अल्पावधीतच अस्तित्व हरवून बसले. यात लोकप्रतिनिधींच्या जवळील कार्यकर्त्याचे तेवढे फावले. ज्या विभागामार्फत ही कामे झाली, तो समाजकल्याण विभागही निद्रीस्त आहे. समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी विशेष बाब म्हणून महागाव-उमरखेड विधानसभा मतदार संघाला सिमेंट रस्त्याच्या कामासाठी हे साडे तीन कोटी रुपये दिले आहे, हे विशेष.