शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास

By विलास गावंडे | Updated: June 16, 2024 20:22 IST

'एसटी'चे एक पाऊल पुढे : बसस्थानकावर रांगेत लागण्याची प्रथा संपणार

विलास गावंडे, यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत विद्यार्थ्यांना शाळेतच पास वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची तासिका बुडवून पासकरिता रांगेत लागण्याची प्रथाही संपणार आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थी, विद्यार्थिनींना याचा लाभ होणार आहे.

परगावातील शाळेत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून तिकिटात सवलत दिली आहे. केवळ ३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक प्रवास पास काढता येतो. शिवाय, शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींना बसस्थानकावर रांगेत उभे राहून किंवा गटागटाने जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घ्यावा लागत होता.पास मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांना घरून लवकर निघावे लागते, ते शक्य नसल्यास शाळेतील काही तासिका बुडवाव्या लागतात. या प्रकारात त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. आता शाळेतच पास मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची धावपळ थांबण्यासोबतच पूर्णवेळ तासिका करण्यास मदत होणार आहे. शाळा - महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना त्यांची एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत.मंगळवारपासून विशेष मोहीम

'एसटी पास थेट तुमच्या शाळेत', ही विशेष मोहीम १८ जूनपासून एसटी प्रशासनातर्फे राबविण्यात येणार आहे. तत्पूर्वी सर्व शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र दिले आहे. शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्याच्या सूचना याद्वारे करण्यात आल्या आहे.सवलत मूल्याचे लाभार्थी वाढवायचे

शाळेमध्ये पासचे वितरण करण्यामागे महामंडळाचा उत्पन्न वाढविणे हा सुद्धा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना दिली जाणारी ६६.६७ टक्के एवढी सवलतीची रक्कम शासनाकडून थेट महामंडळाला मिळते. शिवाय मोफत पासपोटी शंभर टक्के रक्कम मिळते. पासधारक लाभार्थी वाढल्यास महामंडळाच्या तिजोरीत भर पडते. या माध्यमातून तोटा भरून काढण्याचाही प्रयत्न आहे.विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या शाळेत पास वितरित केला जाणार आहे. त्यादृष्टीने आवश्यक त्या सूचना एसटीच्या स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेल्या आहे. काही शाळा सुरू झाल्या असल्याने पासेस वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. - डॉ. माधव कुसेकर, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

टॅग्स :state transportएसटी