शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

माहूरगडासाठी आता रोप-वे आणि लिफ्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 23:49 IST

आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठपैकी पूर्णपीठ असलेल्या माहूरगड येथे रोप-वे आणि लिफ्टसाठी राज्य शासनाने ५५ कोटी रुपयांच्या निधीला तत्वत: मान्यता दिली आहे.

ठळक मुद्दे५५ कोटी मंजूर : केंद्र व राज्य शासनाचा पुढाकार

संजय भगत।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठपैकी पूर्णपीठ असलेल्या माहूरगड येथे रोप-वे आणि लिफ्टसाठी राज्य शासनाने ५५ कोटी रुपयांच्या निधीला तत्वत: मान्यता दिली आहे. यामुळे रेणुकादेवी शिखरसह इतर धार्मिकस्थळांचे दर्शन करणे भाविकांना खासकरून वृद्धांना सोयीचे होणार आहे.नांदेड जिल्ह्यातील माहूर हे संपूर्ण देशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. रेणूकामाता मंदिर, दत्तात्रय शिखर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वरी यासह अनेक धार्मिक स्थळे आहेत. येथे दरररोज भाविकांची मोठी गर्दी असते. सह्यांद्रीच्या डोंगरमाथ्यावर सर्व देवस्थान असल्याने भाविकांना त्यातही वृद्ध भाविकांना गड चढून जाणे कठीण जाते. यासाठी लिफ्ट आणि रोप-वेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. आता याला राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. गतवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहूर तीर्थक्षेत्र विकासासाठी २१६ कोटींच्या निधीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात वर्ष होवूनही कुठलाच निधी आला नव्हता. आता दि. १९ जून रोजी शासनाने रोप-वेसाठी ३९ कोटी १६ लाख रुपये आणि लिफ्टसाठी १५ कोटी ६८ लाख रुपयांचा असा एकूण ५५ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. यामुळे माहूरच्या विकासाचा मार्ग सुकर झाला आहे.माहूर येथील रेणुकामातेवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची अपार श्रद्धा आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ च्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी २३ आक्टोबर २०१७ रोजी ना. नितीन गडकरी माहूर येथे आले होते. त्यावेळी गडावर जाण्यासाठी रोप-वे व लिफ्टची मागणी लवकरच पूर्ण होईल अशी ग्वाही दिली होती. आता निधी मंजूर झाल्याने भाविकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.पैनगंगेवरील पुलासाठी ४५ कोटीमाहूर तालुक्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. यातून पैनगंगा नदीवर ४५ कोटी रुपयांच्या पुलाला मंजूरी देण्यात आली आहे. यासाठी नामदेवराव केशवे यांनी पाठपुरावा केला. लवकरच ही कामे सुरू होणार आहे.माहूरच्या विकासासाठी निधीला तत्वत: मान्यता मिळाली आहे. प्रत्यक्ष काम आणि प्रशासकीय मान्यता मिळायची आहे. कामे सुरू करण्यासाठी किमान सहा महिन्याचा कालावधी लागू शकतो.-ओमप्रकाश बेंब्रे, उपअभियंतासार्वजनिक बांधकाम माहूर

टॅग्स :Templeमंदिरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग