आता यवतमाळातच होणार कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:00:14+5:30

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर यांनी तात्पुरत्या स्वरूपात अत्यावश्यक परिस्थितीत कोरोना चाचणीला मान्यता दिली आहे. त्यासंदर्भातील आदेश २३ मे रोजी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. शिवाय तपासणीकरिता लागणारे ५० कार्ट्रेज उपलब्ध आहे. या स्वॅब तपासणी प्रक्रियेची गती मंद आहे. दिवसभरात १५ नमुने तपासता येणार आहे.

Now the corona test will be done in Yavatmal itself | आता यवतमाळातच होणार कोरोना तपासणी

आता यवतमाळातच होणार कोरोना तपासणी

Next
ठळक मुद्देतरतूद : पूर्णवेळ प्रयोगशाळेला एक आठवड्याचा अवधी

सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या ११५ वर पोहोचली आहे, तर अ‍ॅक्टिव रूग्ण १७ आहेत. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणी करण्याला आयूषकडून मान्यता मिळाली आहे. अत्यावश्यक व तातडीने तपासणी करण्यासाठी ही मान्यता दिली आहे. लवकरच येथील कोरोना लॅब पूर्णत्वास येणार आहे. त्यानंतर सर्वच रुग्णांचे स्वॅब येथे तपासले जातील.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर यांनी तात्पुरत्या स्वरूपात अत्यावश्यक परिस्थितीत कोरोना चाचणीला मान्यता दिली आहे. त्यासंदर्भातील आदेश २३ मे रोजी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. शिवाय तपासणीकरिता लागणारे ५० कार्ट्रेज उपलब्ध आहे. या स्वॅब तपासणी प्रक्रियेची गती मंद आहे. दिवसभरात १५ नमुने तपासता येणार आहे. सध्या नागपूर एम्समध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीला पाठविले जात आहे. मध्यंतरी अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडे स्वॅब तपासणीला पाठविले जात होते. तूर्त आता १५ नमुने दिवसातून तपासण्यासाठी एम्सचे मायक्रोबॉयलॉजी विभाग प्रमुख डॉ. मीना मिश्रा यांनी मान्यता दिली आहे.

मशिनरी पोहोचली, इन्स्टॉलेशन बाकी
यवतमाळात कोविडची तपासणी लॅब तयार व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळेच सिंगापूर येथून कोविड लॅबसाठी लागणारी मशिनरी पोहोचली आहे. कोल्डसेंट्रिफ्यूज येणे बाकी आहे. ते आल्यानंतर पुढील आठवड्यात मशिनरी इन्स्टॉल करून कोविड लॅब सुरू होण्याची शक्यता आहे.

आयसोलेशनमध्ये ३१ जण
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सध्या १७ कोरोनाबाधित रुग्णांसह ३१ जण दाखल आहेत. त्यापैकी १४ प्रिझम्टिव्ह केसेस असल्याचे मेडिकल प्रशासनाने कळविले. रविवारी चार जण आयसोलेशन वॉर्डात भरती झाले. तर १८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ११५ तर सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १७ आहे. दरम्यान यवतमाळात ९६ जण पूर्णत: बरे झाले. तर मूळ यवतमाळातील दोघे पुणे आणि मुंबई येथून ठणठणीत झाले आहे.

Web Title: Now the corona test will be done in Yavatmal itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.