शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

नगरपरिषदेच्या चार विभाग प्रमुखांना नोटीस

By admin | Updated: July 1, 2017 01:03 IST

येथील नगरपरिषदेत राजकीय कुरघोडीसोबतच प्रशासकीय अनागोंदी निर्माण झाली आहे.

प्रभार दिलाच नाही : यवतमाळात प्रशासकीय अनागोंदी लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथील नगरपरिषदेत राजकीय कुरघोडीसोबतच प्रशासकीय अनागोंदी निर्माण झाली आहे. बदली झालेल्या विभाग प्रमुखांनी अजूनही प्रभारच दिला नाही. त्यामुळे नवीन अधिकाऱ्यांना कामकाज करताना अनेक अडचणी येत आहे. मुख्याधिकाऱ्यांनी चार विभाग प्रमुखांना नोटीस बजावत त्यांना प्रभार देण्यासाठी ४८ तासांचा अवधी दिला. नगरपरिषदेत कुणाचा पायपोस कुणाला नाही. सत्ताधाऱ्यांमध्येच एकवाक्यता नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत निवृत्तीच्या उंबरठ्यावरील तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे पूर्ण दुर्लक्ष करून केवळ आर्थिक बाबींवर भर दिला. परिणामी प्रशासकीय पकड सैल झाल्याने कर्मचारी निर्धास्त झाले होते. याला काही अपवादही आहेत. पदाधिकारी राजकीय कुरघोडीत व्यस्त असल्याने कुणीच प्रशासकीय अनागोंदीकडे लक्ष दिले नाही. त्याचा त्रास सामान्य जनतेला आजही होत आहे. पालिकेतील नगरसेवकांवर यापूर्वी त्यांच्या पक्षनेत्यांचे थेट नियंत्रण नव्हते. पालिका पातळीवरच प्रत्येक निर्णय होत होता. आता मात्र प्रत्येक गोष्ट पक्षनेत्यांच्या आदेशावरून होत असल्याने चूक लक्षात येऊनही कुणीच काही करीत नाही, अशी प्रतिक्रिया नगरसेवक व्यक्त करीत आहे. या गोंधळाच्या स्थितीत सहा विभाग प्रमुखांची बदली झाली. त्यातील चौघांनी प्रभार न देताच परस्पर दुसऱ्या पालिकेचा रस्ता धरला. यात आरोग्य विभागातील अंकिता इसळ, पाणीपुरवठा विभागातील पूजा जाधव यांनी बदली झाल्यानंतर प्रभार न देताच दुसरी पालिका गाठली. त्यामुळे या दोन महत्त्वपूर्ण विभागाचे मागील दोन महिन्यापासून कामकाज ठप्प आहे. त्यांच्या जागी आलेल्या नवीन अधिकाऱ्यांना काम कसे करावे, असा प्रश्न पडला आहे. बांधकाम विभागातील अभियंता राजेश ढोले, प्रज्ञा नरवाडे यांनीही प्रभार दिला नाही. या मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी आता मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यांनी या सर्व अधिकाऱ्यांना गुरुवारी नोटीस बजावून नगरपरिषद अधिनियम १९६५ मधील शिस्त व अपिल कलमानुसार कारवाई करण्याच इशारा दिला आहे. यासंदर्भात होणाऱ्या कारवाईकडे संपूर्ण नगरपरिषदेचे लक्ष लागून आहे.