शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निळोणा आणि चापडोह धरण ७५ टक्के भरलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 06:00 IST

यवतमाळ शहरासह लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याचे काम जीवन प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यवतमाळ परिसरात ३९ हजार नळ कनेक्शनधारक आहे. या नळ जोडण्यांवरून अडीच लाखांपेक्षा अधिक नागरिक पिण्याचे पाणी भरतात. दरवर्षी प्रकल्प क्षेत्रात फेब्रुवारीपासून पाण्याचा तुटवडा भासण्यास सुरुवात होते. यावर्षी प्रकल्प क्षेत्रात ७५ टक्के पाणी आहे.

ठळक मुद्देयवतमाळकरांना खूशखबर : उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्रता कमी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत तीन वर्षांपासून यवतमाळकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षी त्याच्या विरुद्ध चित्र प्रकल्प क्षेत्रात आहे. यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नसल्याचे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.यवतमाळ शहरासह लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याचे काम जीवन प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यवतमाळ परिसरात ३९ हजार नळ कनेक्शनधारक आहे. या नळ जोडण्यांवरून अडीच लाखांपेक्षा अधिक नागरिक पिण्याचे पाणी भरतात. दरवर्षी प्रकल्प क्षेत्रात फेब्रुवारीपासून पाण्याचा तुटवडा भासण्यास सुरुवात होते. यावर्षी प्रकल्प क्षेत्रात ७५ टक्के पाणी आहे. यवतमाळकर नागरिकांसाठी ही जमेची बाजू आहे. यावर्षी गत तीन वर्षांप्रमाणे पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, हे मात्र सत्य आहे. निळोणा प्रकल्पाची साठवण क्षमता ४.०६ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पामध्ये सध्या ३ एमएमक्यू जलसाठा शिल्लक आहे. एकूणच क्षमतेच्या ६४ टक्के पाणी निळोणा प्रकल्पात आहे. यासोबतच चापडोह प्रकल्पात ७५ टक्के पाणी शिल्लक आहे. या प्रकल्पाचे साठवण क्षमता १२.२ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर इतकी आहे. प्रकल्पामध्ये आजच्या स्थितीत ९.०१ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. दोनही प्रकल्पांमध्ये १२ एमएमक्यू दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे.हा जलसाठा १२ महिने पुरेल इतका आहे. दर महिन्याला यवतमाळकरांना १ एमएमक्यू पाणी लागते. यासोबत वेस्टेज पाणी आणि पाण्याची नासाडी लक्षात घेता आठ महिने पुरेल इतके पाणी दोन्ही जलप्रकल्पात सध्या शिल्लक आहे. आॅक्टोबर २०२० पर्यंत हे पाणी यवतमाळकरांना पुरेल, अशी संपूर्ण परिस्थिती आहे. यामुळे मार्च ते मे या कालावधीत यवतमाळमध्ये पाणीटंचाई भासणार नाही. जूनमध्ये पावसाचा विलंब झाला तरी त्याचा कुठलाही परिणाम यवतमाळकरांच्या दैनंदिन कामाजावर होणार नाही. प्रकल्पातील पाणी साठ्याची आलबेल स्थिती यावर्षी प्रथमच राहिली आहे.यवतमाळकरांना सध्या ज्या वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा होतो त्या वेळापत्रकानुसार म्हणजे चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. उन्हाळ्यातही पाण्याचे असेच वेळापत्रक राहणार आहे.यावर्षी दोन्ही प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा कायम आहे. यामुळे पुढील काळात पाणी कपातीचे धोरण राहणार नाही, मात्र यवतमाळकरांनी पाण्याचा जपून वापर करावा.- सुरेश हुंगेकार्यकारी अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

टॅग्स :Nilona Damनिळोणा धरणWaterपाणी