शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पाच ‘मेडिकल’मध्ये ‘एनआयसीयू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 11:05 IST

आता राज्यातील पाच वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत ‘एनआयसीयू’ (निओनेटल इनटेसिव्ह केअर युनिट) साकारले जात आहे. त्यासाठी कॅलिफोर्नियाच्या स्टॅँडफोर्ड विद्यापीठाची तांत्रिक मदत घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देस्टँडफोर्ड विद्यापीठाचे सहकार्य वाढत्या प्रसूती दरामुळे यवतमाळची निवड

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून अनेक उपक्रम राबविले जातात. त्यानंतरही शासकीय रुग्णालयातील बालमृत्यूचेप्रमाण कमी होत नाही. यासाठी आता शासकीय रुग्णालयात अद्ययावत ‘एनआयसीयू’ (निओनेटल इनटेसिव्ह केअर युनिट) साकारले जात आहे. त्यासाठी कॅलिफोर्नियाच्या स्टॅँडफोर्ड विद्यापीठाची तांत्रिक मदत घेतली जाणार आहे. राज्यातील पाच वैद्यकीय महाविद्यालयात सदर युनिट साकरले जाणार असून त्यात यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे.मुख्यमंत्री कार्यालयाने बालमृत्यू थांबविण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील एनआयसीयूमध्ये मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. यासाठी टाटा ट्रस्टची मदत घेतली जाणार आहे. सुरुवातील प्रायोगिक तत्वावर स्टॅँडफोर्ड विद्यापीठाच्या तांत्रिक मार्गदर्शनात एनआयसीयू तयार केला जात आहे. यासंदर्भात ‘सीएमओ’कडून स्वतंत्र निर्देश देण्यात आले आहेत.राज्यातील पाच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे. यासाठी येथील अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगीरीवार यांनी विशेष पाठपुरावा केला. यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात सर्वाधिक प्रसूतीचे प्रमाण आहे. येथे वर्षभरात किमान आठ हजार महिलांची प्रसूती होते. सध्या उपलब्ध असलेल्या एनआयसीयूमध्ये केवळ १७ खाटा आहेत. यामुळे येथे गर्दी होते. परिणामी उपचाराच्या दर्जावरही याचा परिणाम होतो. ही गरज ओळखून यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत एनआयसीयू तयार करण्याचे निर्देश ‘सीएमओ’कडून नुकत्याच झालेल्या व्हीडीओ कॉन्फरसिंगमध्ये मान्य करण्यात आले. यवतमाळच्या ‘मेडिकल’मध्ये लवकरच अद्ययावत ५० खाटांचे एनआयसीयू सुरू होईल. लवकरच यावर प्रशासकीयस्तराव निर्णय होणार आहे. याचा फायदा दुर्गम भागातील नवजात बालकांना होणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्य