लग्नानंतर एका आठवड्यातच नवविवाहितेचा झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 22:47 IST2021-05-15T22:47:43+5:302021-05-15T22:47:58+5:30

मागील आठवड्यात लग्न झालेल्या एका नवविवाहितेचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

The newlyweds died within a week of the wedding | लग्नानंतर एका आठवड्यातच नवविवाहितेचा झाला मृत्यू

लग्नानंतर एका आठवड्यातच नवविवाहितेचा झाला मृत्यू

मुकुटबन (यवतमाळ) : मागील आठवड्यात लग्न झालेल्या एका नवविवाहितेचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मागील आठवड्यात येथील प्रवीण मुद्दमवार यांचा विवाह गावातीलच पूजा नामक युवतीशी झाला. परंतु, हे नियतीला मान्य नसल्याने आठवड्याच्या शेवटी पूजाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पूजा व प्रवीण यांचा विवाह रितीरिवाजाप्रमाणे पार पडला. लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी वधूला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तिला तातडीने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. परंतु, शरीरात रक्त पुरवठा कमी असल्याने रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.  या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक रक्तदाने रक्तदानासाठी  पुढे आले. रक्तदात्यांनी वेळेचे भान ठेऊन रक्तसुद्धा दिले. परंतु तिला वाचविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. १३ मे रोजी रात्रीच तिने अखेरचा श्वास घेतला. ही बातमी गावात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तिच्यावर मुकुटबन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: The newlyweds died within a week of the wedding