शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नेर एसटी आगाराचे वेळापत्रक कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 23:50 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नेर आगारात वेळापत्रकाचा बोजवारा उडाला आहे. रात्री ८ वाजताची बस चक्क एक वाजता लावण्याचा प्रतापही या आगाराने केला आहे. अवेळी सुटणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देप्रवासी त्रस्त : आठ वाजताची बस लागली चक्क रात्री एकला

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नेर आगारात वेळापत्रकाचा बोजवारा उडाला आहे. रात्री ८ वाजताची बस चक्क एक वाजता लावण्याचा प्रतापही या आगाराने केला आहे. अवेळी सुटणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विभागीय नियंत्रकांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.मागील महिनाभरापासून या आगाराचा कारभार ढेपाळला आहे. आगार व्यवस्थापक नसल्याने संपूर्ण शेड्यूल बिघडले आहे. चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही. बसेसचे ठरलेले वेळापत्रक कोलमडले आहे. संपूर्ण दिवसभरातील फेऱ्या कमीअधिक फरकाने उशिरा जात आहेत. काही दिवसांपूर्वी तर बसफेरी उशिरा सोडण्याचा विक्रमच या आगाराने केला आहे. नेर-वाढोणा ही मुक्कामी बस रात्री ८ वाजता येथून सुटते. यादिवशी चक्क रात्री एक वाजता ही फेरी येथून रवाना झाली. तोपर्यंत अनेक प्रवासी याठिकाणी ताटकळत होते.सावरगाव(काळे), वाढोणा, बाभूळगाव, दारव्हा आदी गावच्या मुक्कामी बसेस बहुतांशवेळा खूप उशिराने सोडल्या जातात. बसेस प्लॅटफार्मवर लावल्या जात नाहीत. अनेकवेळा तर फलक लावण्याचेही टाळले जाते. बसस्थानकात थांबून असलेल्या प्रवाशांना उठून जाऊन चालक वा वाहकाकडे ‘ही बस कुठे जात आहे’ याची विचारणा करावी लागते. अनेकदा तर प्रवाशांवर खेकसण्याचेही प्रकार घडतात. याठिकाणी आगार व्यवस्थापक दिल्यास कोलमडलेले वेळापत्रक नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.बसफेरी रद्द व्हावी म्हणून असाही प्रयोगनियमित वेळेपेक्षा उशिरा बसेस सोडण्यामागील कारण भंडावून सोडणारे आहे. मुक्कामी बस रद्द व्हावी यासाठी चालक-वाहकांकडून असा प्रयोग केला जात असल्याचे सांगितले जाते. बसला उशीर होत असल्यास अनेक प्रवासी मिळेल त्या साधनाने निघून जातात. अशावेळी बसला प्रवासी मिळत नाही. हीच संधी पाहून फेरी रद्द केली जाते, असे सांगितले जाते.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ