शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

मेहतर समाजाला फुले-आंबेडकरांच्या विचारांची गरज

By admin | Updated: December 4, 2015 02:42 IST

इंग्रजांच्या सानिध्यात राहणारा, शहरातील सर्व सोयी-सवलतींचा लाभ घेणारा, एकेकाळी टाय-सुट-बुटात वावरणारा, ....

संजीव खुदशाह : स्मृतीपर्वात समाजाच्या ‘दशा आणि दिशे’वर मंथन, युवक-युवतींचाही सन्मानयवतमाळ : इंग्रजांच्या सानिध्यात राहणारा, शहरातील सर्व सोयी-सवलतींचा लाभ घेणारा, एकेकाळी टाय-सुट-बुटात वावरणारा, उत्तम इंग्रजी बोलणारा मेहतर समाज शिक्षणाअभावी आणि फुले-आंबेडकर विचारांपासून दूर राहिल्यानेच दिशाहीन झाला आहे, असे प्रतिपादन पत्रकार, लेखक, सफाई कामगार समुदायाचे अध्यक्ष संजीव खुदशाह यांनी केले.स्मृतीपर्वात बुधवारी ३ डिसेंबर रोजी संत कबीर विचारपीठाहून ते बोलत होते. ‘मेहतर समाज दशा आणि दिशा’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी उत्कृष्ट महिला पुरस्कारप्राप्त, मानवमुक्ती संग्राम पुणेच्या संस्थापिका निशाताई पारचे होत्या.ते पुढे म्हणाले, एकेकाळी गावकुसाबाहेरचे उपेक्षित जीवन जगणारा, अन्न, वस्त्र आणि निवारा नसणारा बाबासाहेबांचा समाज केवळ आणि केवळ शिक्षणाच्या भरोशावर आज विकसित झाल्याचे दिसते. शिक्षणाचे महत्त्व महात्मा फुलेंनी जाणले. आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून बहुजनांना संधी उपलब्ध करून दिली, असे असूनही मेहतर समाज पुरोगामी विचारांपासून वेगळा राहण्याचे षड्यंत्र येथील प्रतिगामी लोकांनी केले. आमची केवळ स्तुती केली. त्यामागेही त्यांचा स्वार्थ होता. आम्ही करीत असलेली निकृष्ट कामे त्यांना करावी लागू नयेत हा त्या मागचा हेतू होता. इंग्रजांच्या वेळचे जुलमी कायदे रद्द करण्याचे श्रेयही डॉ. आंबेडकरांनाच जाते, असे ते म्हणाले. मेहतर समाजाच्या विकासासाठी या महामानवांचे विचार अंमलात आणण्याची गरज यावेळी त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा निशाताई पारचे यांनी स्त्रियांची कुचंबना व्यक्त केली. अजूनही मेहतर समाजात स्त्रियांचे स्थान दुय्यम असून झाडू, घुंंघट यातच ही स्त्री अडकून पडली आहे. पती निधनानंतरच्या कुप्रथा नष्ट करण्याची गरज आहे. घुंघट घेण्याचीसुद्धा आज गरज नाही, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रनिर्मितीसाठी स्त्रिया अत्यंत महत्त्वाच्या असून त्या शिक्षणाने स्वाभिमानी, स्वावलंबी होण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली. प्रमुख वक्त्याच्या भाषणापूर्वी हरिश जानोरकर नागपूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बौद्ध धम्माने मेहतर समाजाला सन्मानाने वागविले. सुमित भंगी भिक्कू बनले. त्या बौद्ध धम्माचा आपण आदर केला पाहिजे. तसेच आजच्या काळात रोटी-बेटी व्यवहार झाले तर समाज जोडण्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी पुरुषोत्तम गायकवाड, दिनेश चिंडाले, सविता चव्हाण यांचेही मनोगत झाले. कार्यक्रमाच्या विचारपीठावर रमेश तांबे, नयन मलिक, मयूर सिंघानिया इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका मयूर सिंघानिया हिने केले. प्रास्ताविक विनायक व्यास याने केले तर राजेंद्र चव्हाण यांनी आभार मानले. समाजातील युवक-युवतींचा विशेष योगदानाबद्दल यावेळी सन्मान करण्यात आला. (सांस्कृतिक प्रतिनिधी)