शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

बेंबळा प्रकल्पातील 'अमृत' निर्विघ्न टाकळीपर्यंत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:00 IST

बेंबळा प्रकल्पावरील जाकवेल आणि फिल्टर प्लांटवर एकूण आठ मोटारपंप आहेत. योजना पूर्ण झाल्यानंतर या सर्व पंपाद्वारे पाणी उपसले जाणार आहे. या योजनेअंतर्गत यवतमाळ शहरातही नवीन पाईप लाईन टाकण्यात आली आहे. त्यावरून जोडण्या देण्यात आल्या. अजूनही काही ठिकाणीची कामे सुरू आहेत. पुढील काळात निळोणा, चापडोह आणि बेंबळा प्रकल्पाचे पाणी यवतमाळकरांना मिळणार आहे. 

ठळक मुद्देचार वर्षांपासूनची उत्सुकता : १८ किलोमीटरवर पाणी आणण्यात यश

विलास गावंडेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा प्रकल्पाचे पाणी टाकळी येथील फिल्टर प्लांटपर्यंत पोहोचविण्यात प्राधिकरण मंगळवारी यशस्वी झाले. विघ्नांची मालिका घेऊन एक एक टप्पा पार पाडताना चाचणी निर्विघ्न पार पडली. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास टाकळीत पाणी येऊन पोहोचल्यानंतर आता यवतमाळकरांना काही महिन्यातच या पाण्याची चव चाखायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.यवतमाळ शहराची पुढील काळातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता ३०२ कोटी रुपयांची अमृत योजना सन २०१७ मध्ये हाती घेण्यात आली. बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाचे पाणी यासाठी घेतले जाणार आहे. यासाठी बेंबळा प्रकल्पावर जॅकवेलपासून टाकळी प्रकल्पापर्यंत एक हजार मी.मी.ची पाईप लाईन टाकण्यात आली होती. यासाठी वापरलेले निकृष्ट पाईप अनेक ठिकाणी फुटले. लोकांची शेतं जलमय होऊन नुकसान झाले.संपूर्ण पाईपलाईनच सदोष असल्याने १८ किलोमीटर पाईप बदलविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामालाही दीर्घ कालावधी लागला. नवीन पाईपलाईनची चाचणी सुरू झाली. यातही बहुतांश ठिकाणी लिकेज निघाले. आठवडाभरापूर्वी पाईप धुवून स्वच्छ करण्यात आले. टाकळी येथील फिल्टर प्लांटमध्ये मंगळवारी पाणी सोडण्याचे ठरले. यानुसार सकाळी १०.३० वाजता जॅकवेलवरील ५७० एचपीची एक मोटर सुरू करून पाणी सुरू करण्यात आले.बेंबळा प्रकल्पावरील जाकवेल आणि फिल्टर प्लांटवर एकूण आठ मोटारपंप आहेत. योजना पूर्ण झाल्यानंतर या सर्व पंपाद्वारे पाणी उपसले जाणार आहे. या योजनेअंतर्गत यवतमाळ शहरातही नवीन पाईप लाईन टाकण्यात आली आहे. त्यावरून जोडण्या देण्यात आल्या. अजूनही काही ठिकाणीची कामे सुरू आहेत. पुढील काळात निळोणा, चापडोह आणि बेंबळा प्रकल्पाचे पाणी यवतमाळकरांना मिळणार आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी केली कामाची पाहणी- अमृत योजनेच्या कामाला गती मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित यंत्रणेशी सतत संपर्क ठेवला. - मंगळवारी बेंबळाचे पाणी फिल्टर प्लांटवर पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. कामाची गती वाढविण्याची अपेक्षा त्यांनी केली.- योजनेच्या अनेक कामांचाही आढावा त्यांनी संबंधित यंत्रणेकडून घेतला. योजनेसंबंधी अनेक विषयांची माहिती त्यांनी जाणून घेतली. 

यवतमाळकरांना तीन महिने प्रतीक्षाबेंबळाचे पाणी मिळण्यासाठी यवतमाळकरांना आणखी किमान तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. फिल्टर प्लांटचे आणखी १५ ते २० टक्के काम शिल्लक आहे. शिवाय टाकळीपासून प्राधिकरणाच्या गोदणी रोडवरील कार्यालयापर्यंत टाकण्यात आलेल्या ८०० एमएम पाईपची पूर्ण चाचणी व्हायची आहे.

कामाची गती अजूनही संथअमृत योजनेचे काम नाशिकच्या आडके कंपनीला देण्यात आले आहे. सुरुवातीपासूनच कंत्राटदाराची मनमानी सुरू आहे. योजना पूर्ण करण्याचा कालावधी दोन वर्षांपूर्वीच संपला. पालकमंत्री, प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी या कंत्राटदाराला तंबी दिली. शिवसैनिकांनी आंदोलन केले. अजूनही कामाची अपेक्षित गती वाढलेली नाही. कंत्राटदाराच्या कामाची गती आता आहे तशीच राहिल्यास योजना पूर्ण होण्याचा कालावधी लांबणीवर पडणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे.

तर २४ तास पाणी मिळेल पण...अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर यवतमाळकरांना २४ तास पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र, यासाठी किमान सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे. तीनही मुख्य संतुलन टाक्यांची कामे पूर्ण व्हायची आहेत. एका टाकीचे बांधकामच सुरू आहे. मोटर पंपासाठी आवश्यक तेवढी वीज उपलब्ध नाही. पम्प हाऊसचे काम पूर्ण झालेले नाही.

दर वाढण्याचे संकेतबेंबळा प्रकल्पाचे पाणी सुरू झाल्यानंतर पाण्याचे दर वाढण्याचे संकेत मिळाले आहे. या योजनेचा खर्च अवाढव्य आहे. विदुयत बिलासाठीच सध्या दरमहा पाच लाख रुपये मोजावे लागत आहे. आणखी सहा पंपासाठी वीज घ्यावी लागणार आहे. इतर प्रकारचाही खर्च वाढणार असल्याने पाण्याचे दरही चांगलेच फुगेल, असे दिसते.

 

टॅग्स :WaterपाणीBembla Damबेंबळा धरण