शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

यवतमाळ-वाशिमवर राष्ट्रवादीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:00 PM

यवतमाळ - वाशिम लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती भक्कम असून आघाडीच्या वाटाघाटीत हा मतदासंघ राष्ट्रवादीलाच मिळावा, असा एकमुखी सूर जिल्हा कार्यकर्ता बैठकीतून उमटला. शिवाय विधानसभेच्याही जागा वाटपात राष्ट्रवादीला किमान चार मतदारसंघ मिळावेत, अशी मागणी पक्ष निरीक्षकांकडे करण्यात आली. पक्षाने बुथ लेव्हलपासून बांधणी केली असून काही मतदारसंघात अनुकूल वातावरण असल्याचे सूतोवाच नेत्यांनी केले.

ठळक मुद्देकार्यकर्ता बैठक : आघाडीच्या वाटाघाटीत हव्या बरोबरीच्या जागा, विधानसभेवरही डोळा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ - वाशिम लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती भक्कम असून आघाडीच्या वाटाघाटीत हा मतदासंघ राष्ट्रवादीलाच मिळावा, असा एकमुखी सूर जिल्हा कार्यकर्ता बैठकीतून उमटला. शिवाय विधानसभेच्याही जागा वाटपात राष्ट्रवादीला किमान चार मतदारसंघ मिळावेत, अशी मागणी पक्ष निरीक्षकांकडे करण्यात आली. पक्षाने बुथ लेव्हलपासून बांधणी केली असून काही मतदारसंघात अनुकूल वातावरण असल्याचे सूतोवाच नेत्यांनी केले.यवतमाळातील सहकार भवनात सोमवारी राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले.राष्ट्रवादीने जिल्ह्यात गाव पातळीपासून बांधणी केली आहे. बुथ कमिट्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली आहे. मात्र निवडणुकीच्या काळात प्रदेशस्तरावर वाटाघाटी करून तिकीट वाटप केले जाते. त्यानंतर गावपातळीवर असलेल्या कार्यकर्त्याला दुसºयाच कोणाचे काम करावे लागते. पक्षाची शक्ती कितीवेळा दुसºयासाठी खर्च करायची, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या लोकसभेत यवतमाळ-वाशिममधून राष्ट्रवादीच लढणार आहे. सलग दोन वेळा येथे काँग्रेसचा पराभव झाला आहे. लोकसभेतील राष्ट्रवादीचा संभाव्य उमेदवार नाईक घराण्यातील राहील, अशी घोषणा करण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग होते. तर प्रमुख उपस्थितीत माजी आमदार संदीप बाजोरिया, पक्षनिरीक्षक किशोर माथनकर, नानाभाऊ गाडबैले, वसंतराव घुईखेडकर, सभापती निमिष मानकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशीष मानकर, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ क्रांती राऊत, सुभाष ठोकळ, ययाती नाईक, अनुताई राठोड, बी.जी. राठोड, शिवाजी राठोड, अशोकराव घारफळकर, सतीश भोयर, उत्तमराव शेळके, मुबारक तंवर, उत्तम गुल्हाने, अ‍ॅड. अनिरूध्द लोणकर, वर्षा निकम यांच्यासह जिल्हाभरातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.