शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवाकोरा पूल मुसळधार पावसात उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 20:50 IST

तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गांजेगाव येथील वर्षभरापूर्वीच झालेल्या पुलावरील रस्ता पूर्णत: उखडून गेला आहे. पुलावरील लोखंडी गजही उघडे पडल्याने ढाणकी-हिमायतनगर मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे.

ठळक मुद्देनागरिकांची गैरसोय : ढाणकी-हिमायतनगर मार्गावरील वाहतूक बंद

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गांजेगाव येथील वर्षभरापूर्वीच झालेल्या पुलावरील रस्ता पूर्णत: उखडून गेला आहे. पुलावरील लोखंडी गजही उघडे पडल्याने ढाणकी-हिमायतनगर मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे.ढाणकी-गांजेगाव मार्गे मराठवाड्यातील हिमायतनगरला जोडण्यासाठी पैनगंगा नदीवर गांजेगाव येथे हा पूल बांधण्यात आला. दोन दिवस संततधार पाऊस पडल्याने या पुलावरून पाणी गेले. वर्षभरापूर्वी तयार करण्यात आलेला पुलावरील रस्ता पाण्यात वाहून गेला. येथे यापूर्वी सिमेंटचा रस्ता होता. ते सिमेंटही वाहून गेले. पुलावरील गज उघडे पडले असून नवे डांबरही वाहून गेले आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.या पुलाची दुरुस्ती त्वरित करणे गरजेचे आहे. पुलाव्यतिरिक्तही या रस्त्यावर सर्वत्र १५ किलोमीटरपर्यंत पावसामुळे खड्डे पडले आहे. उमरखेड आगारातून सुरू असलेल्या आठ बसफेऱ्याही रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सध्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उमरखेड एसटी आगाराला सर्वात जास्त उत्पन्न देणारा मार्ग बंद झाला आहे. उमरखेड तालुक्यातून तिरुपती, आंध्रप्रदेश, नांदेड, मुंबई रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांचे हाल होत आहे. तसेच मराठवाड्यातून व गांजेगाव येथून ढाणकीला शिक्षणासाठी येणाºया शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने हा रस्ता त्वरित दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक