शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

दिग्रसमध्ये घडले राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

शहरात शिवछत्रपती संघटनेच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक घंटीबाबा मंदिरासमोर येताच मुस्लीम शिवजयंती उत्सव समितीतर्फे मिरवणुकीत सहभागी नागरिकांना फराळाचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देशिवजयंती मिरवणूक : मुस्लीम बांधवांकडून स्वागत, ठिकठिकाणी फराळाचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी मुस्लीम शिवजयंती उत्सव समितीतर्फे स्वागत करण्यात आले. यातून शहरात राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन घडले.शहरात शिवछत्रपती संघटनेच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक घंटीबाबा मंदिरासमोर येताच मुस्लीम शिवजयंती उत्सव समितीतर्फे मिरवणुकीत सहभागी नागरिकांना फराळाचे वाटप करण्यात आले.शिवछत्रपती संघटनेचे रवींद्र अरगडे, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, केतन रत्नपारखी, आरोग्य सभापती सैयद अकरम, विनायक दुधे, ठाणेदार सोनाजी आमले, माजी नगराध्यक्ष नूर महमद खान, अरविंद मिश्रा, प्रज्योत अरगडे, राहुल देशपांडे आदींचे मुस्लीम बांधवांनी स्वागत केले.मुस्लीम शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अफजल खान, सचिव अरबाज धारिवाला, पी.पी. पप्पूवाले, सुरेश चिरडे, मजहर अहमद खान, किशोर कांबळे, यशवंत सूर्वे, साजीद पतलेवाले, घंटीबाबा संस्थानचे अध्यक्ष नाना पाटील महिंद्रे, सचिव डॉ.प्रदीप मेहता, प्रा.मतीन खान, विष्णूपंत यादव, रामदास पद्मावार, मुनीर खान, उद्धव अंबुरे, अमीन कलरवाले, अभय इंगळे, अजीज शेख, गोपाल शाह, अमीन चव्हाण आदींनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.या उपक्रमातून सामाजिक ऐक्याचे दर्शन झाले. दिग्रस शहरामध्ये नेहमीच सामाजिक एकोपा जोपासला जातो, असा संदेश यातून देण्यात आला. शहरात सर्वधर्मीय एकोप्याने नांदतात. सण, उतसव साजरे करतात. त्याची पुन्हा एकदा शिवजयंतीनिमित्त प्रचिती आली.

टॅग्स :Shivjayantiशिवजयंती