शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण; तरीही वाहनधारकांना बसतोय टोलचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 22:02 IST

तत्कालीन प्रकल्प संचालकांनी चुकीचा अहवाल पाठविल्यामुळे शेतकरी योग्य मोबदल्यासाठी उच्च न्यायालयात गेले आहे. निर्णय न्यायप्रविष्ट असल्यामुळे दोन किलोमीटर अंतरात अद्याप रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले आहे. नांदेडवरून निघालेले वाहन अतिशय खडतर रस्त्याने प्रवास करत, भांब येथील टोल नाक्यापर्यंत येत आहे. वाहनधारकांना वाहतुकीयोग्य रस्ता मिळत नाही. मात्र, त्यांना टोल भरावा लागत आहे. हा अन्याय असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : नागपूर-बोरी-तुळजापूर या नॅशनल हायवे ३६१ चे महागाव ते वारंगा रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे, परंतु या रस्त्यावरून समोर नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांना नाहक टोल द्यावा लागत आहे. रस्ता पूर्ण होण्याआधीच महागाव ते यवतमाळ रस्त्यावर दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली. रस्ता अपूर्ण असताना, टोलचा भुर्दंड भरावा लागत असल्यामुळे वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ‘नॅशनल हायवे की मृत्यूचा सापळा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले. महागाव ते वारंगा दरम्यान काम करणाऱ्या एजन्सीचे कंत्राट रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. याच रस्त्यावरील खड्डे बुजविणे आणि बायपास रस्त्यावरील कामे सुरळीत करण्यासाठी नव्याने निविदा बोलावण्यात आली आहे.महागाव ते यवतमाळ रस्त्यावरील हिवरा संगम येथील बायपासवर असलेल्या शेतकऱ्यांचा तत्कालीन प्रकल्प संचालकांनी चुकीचा अहवाल पाठविल्यामुळे शेतकरी योग्य मोबदल्यासाठी उच्च न्यायालयात गेले आहे. निर्णय न्यायप्रविष्ट असल्यामुळे दोन किलोमीटर अंतरात अद्याप रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेले आहे. नांदेडवरून निघालेले वाहन अतिशय खडतर रस्त्याने प्रवास करत, भांब येथील टोल नाक्यापर्यंत येत आहे. वाहनधारकांना वाहतुकीयोग्य रस्ता मिळत नाही. मात्र, त्यांना टोल भरावा लागत आहे. हा अन्याय असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.महागाव ते वारंगा हा रस्ता नॅशनल हायवे प्रकल्प संचालक नांदेड कार्यालयांतर्गत येतो. प्रकल्प संचालकांचा वेळकाढूपणा वाहनधारकांची डोकेदुखी बनला आहे. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे चार वर्षांपासून रस्त्यावरील एकही पूल पूर्णत्वाला गेला नाही. त्यामुळे नांदेड ते नागपूर जाणारे वाहनधारक केंद्र सरकारच्या नावाने बोटे मोडू लागले आहेत.

अर्धवट महामार्गामुळे वाहतूक कोंडी- उमरखेड : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग उमरखेड शहराच्या बाहेरून जातो. ढाणकी रस्त्याला क्रॉस करणाऱ्या जागी हा महामार्ग अर्धवट आहे. उड्डाणपूलही अर्धवट आहे. त्यामुळे तीनही बाजूंनी येणाऱ्या वाहनांना वाहन समोर काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी या ठिकाणी अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे.- नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीबद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. कंपनी निकृष्ट आणि अर्धवट काम करीत असून महामार्गाचे काम वाऱ्यावर सोडून कंपनी कामात वेळखाऊपणा करीत आहे. यापूर्वी हदगाव तालुक्यातील गोजेगाव पुलाजवळ रात्रभर वाहतूक ठप्प पडली होती. गोजेगाव येथेसुद्धा पुलाचे काम अर्धवट पडलेले आहे. तेथील रस्ता हा चिखलमय झाला आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यात साचलेल्या चिखलात रात्रभर ट्रक अडकला होता. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना संपूर्ण रात्र अडकून पडावे लागले होते.

 

टॅग्स :highwayमहामार्गFarmerशेतकरी