शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

कळंबच्या चिंतामणीचे नाव राष्ट्रीय स्तरावर गेले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:02 PM

श्री चिंतामणीचे नाव राष्ट्रीय स्तरावर जावे, इतका महिमा या मंदिराचा आहे. परंतु या मंदिराची ख्याती आणि माहिती सर्वदूर पोहोचविण्यात आपण अपयशी ठरतो आहो.

ठळक मुद्देविजय दर्डा : देवस्थान समितीतर्फे भावपूर्ण सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : श्री चिंतामणीचे नाव राष्ट्रीय स्तरावर जावे, इतका महिमा या मंदिराचा आहे. परंतु या मंदिराची ख्याती आणि माहिती सर्वदूर पोहोचविण्यात आपण अपयशी ठरतो आहो. येणाऱ्या काळात या मंदिराचे नाव राष्ट्रीय स्तरावर गेले पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करु, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी विजय दर्डा हे शनिवारी कळंब नगरीत आले होते. त्यांनी श्री चिंतामणीचे पूजन व आरती केली. यावेळी चिंतामणी देवस्थान समितीच्यावतीने विजय दर्डा यांचा मंदिर सभागृहात सत्कार सोहळा घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून राळेगावचे आमदार प्राचार्य डॉ.अशोक उईके, कळंबच्या नगराध्यक्ष सुनिता डेगमवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, चिंतामणी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा आदी उपस्थित होते.विजय दर्डा म्हणाले, चिंतामणीचे मंदिर परदेशात असते तर तेथील लोकांनी या स्थळाला जागतिक पर्यटन स्थळाचे स्वरुप आणले असते. परंतु आपल्याकडील अनेक पौराणिक व धार्मिक महत्व असणारी स्थळे अडगळीत पडली आहे. या स्थळांना विकसित केल्यास तेच पर्यटनस्थळ होऊ शकते. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होऊ शकतो. परंतु आजपर्यंतच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले. खर तर टुरीझम हा विषय फार महत्वाचा आहे. खासदार असताना मी हा विषय वारंवार सभागृहात मांडला. टुरीझम हा विभाग स्वत: पंतप्रधानांनी आपल्या अखत्यारित्या ठेवला तर मोठा बदल घडेल, अशी अपेक्षाही विजय दर्डा यांनी व्यक्त केली.सत्कार सोहळ्याचे संचालन प्रा.घनश्याम दरणे यांनी केले. आभार चंद्रशेखर चांदोरे यांनी मानले. यावेळी अनेकांनी विजय दर्डा यांचे पुष्पहाराने स्वागत केले.या प्रसंगी नगर उपनगराध्यक्ष मनोज काळे, खरेदी-विक्री संघाचे सभापती बालु पाटील दरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंदराव जगताप, देवस्थानचे उपाध्यक्ष चंद्रकांत गोसटवार, सचिव श्याम केवटे, बाजार समितीचे संचालक योगेश धांदे, मधुकर गोहणे, महेश जयस्वाल, गजानन उमरतकर, विजय गेडाम, प्रताप पारसकर, सुभाष यादव, नसीम काझी, अनिल नवाडे, राजेंद्र हारगुडे, सिध्देश्वर वाघमारे, प्रतिभा मेत्रे, रमेश मेत्रे, बाबा लुकमान, रामेश्वर सातपुते, प्रवीण निमकर, मुश्ताक शेख, भगवंत उमरतकर यांच्यासह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाChintamani, Kalambचिंतामणी, कळंब