शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नेरमध्ये लवकरच ’एमआयडीसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:13 IST

रोजगारासाठी परप्रांतात भटकंती करणाऱ्या तालुक्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी शहरातच उपलब्ध होणार आहे. ४७ हेक्टर क्षेत्रात एमआयडीसी (औद्योगिक क्षेत्र) होणार आहे. मुंबई मंत्रालयाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तेजूसिंग पवार यांनी यासाठी शुक्रवारी जागेची पाहणी केली.

ठळक मुद्दे४७ हेक्टर क्षेत्र : प्रस्तावित जागेची डेप्युटी सीईओंकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : रोजगारासाठी परप्रांतात भटकंती करणाऱ्या तालुक्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी शहरातच उपलब्ध होणार आहे. ४७ हेक्टर क्षेत्रात एमआयडीसी (औद्योगिक क्षेत्र) होणार आहे. मुंबई मंत्रालयाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तेजूसिंग पवार यांनी यासाठी शुक्रवारी जागेची पाहणी केली.दारव्हा रोडवरील नबाबपूर गटातील जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शासकीय वसतिगृहाजवळील जागा प्रस्ताविक करण्यात आली आहे. साठी मोका पाहणी औद्योगिक विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजूसिंग पवार, अमरावती विभागीय प्रादेशिक विकास महामंडळ अधिकारी एस.बी. फुके, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार अमोल पोवार, नेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नीलेश जाधव, नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांनी जागेची पाहणी केली.शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाल्हे, शहर प्रमुख दीपक आडे आदींनी नेर शहरात औद्योगिक वसाहत व्हावी यासाठी निवेदने दिली. नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांनीही यासाठी पाठपुरावा केला. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मंत्रालयात हा विषय लाऊन धरला. अखेर यादृष्टीने जागेची पाहणी तेजकुमार पवार यांनी केली.लहानांपासून मोठ्या उद्योगांना संधीनेर शहरातील औद्योगिक क्षेत्रात खते, औषधी, हिरा कारखाना, कापूस केंद्र, रेचे, ट्रक, स्कूटर, सायकल, घड्याळ, दूध शीतकेंद्र, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, अन्न पदार्थ आदी उद्योगाची उभारणी केली जाणार आहे. कारखान्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या भूखंडाची आखणी, शेड उभारणी, रस्ते, पाणी, वीज आदी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. बँक, डाकघरही याठिकाणी असणार आहे.प्रस्तावित जागेला लवकरच मंजुरी मिळून नेरमध्ये एमआयडीसी साकारली जाईल. यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. एमआयडीसीमुळे बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल.- संजय राठोड, महसूल राज्यमंत्रीएमआयडीसीसाठी जागेची पाहणी करण्यात आली आहे. दारव्हा रोडवरील जागा योग्य आहे. लवकरच अंतरिम मंजूरी मिळून एमआयडीसी साकार होणार आहे.- तेजूसिंग पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, औद्योगिक विभाग, मंत्रालय, मुंबईएमआयडीसीसाठी जागेची पाहणी आणि शिक्कामोर्तब झाल्याने शहराच्या वैभवात भर पडणार आहे. शिवाय तालुक्यातील बेरोजगारांना काम मिळेल.- पवन जयस्वाल, शिवसेना गट प्रमुख नगरपरिषद, नेर

टॅग्स :MIDCएमआयडीसीSanjay Rathodसंजय राठोड