पुसद : येथील गुलामनबी आझाद शिक्षण संकुलाच्या प्रांगणात गुरुवारी मुस्लीम समाजाचा सामूहिक विवाह मेळावा पार पडला. यात २४ जोडपी विवाहबद्ध झाली. अल्हाज अतहर मिर्झा मेमोरियल ट्रस्टतर्फे आयोजित मेळाव्याचे हे आठवे वर्ष होते. आतापर्यंत १६८ जोडपी विवाहबद्ध झाल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ. वजाहत मिर्झा यांनी यावेळी दिली.यावेळी व्यासपीठावर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष विजय चव्हाण, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ. मोहम्मद नदीम, अॅड. आशीष देशमुख, युवक काँग्रेसचे समन्वय संघटक अॅड. सचिन नाईक, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव ज्ञानेश्वर तडसे, नगरपरिषद बांधकाम सभापती जकी अनवर, पंचायत समिती सदस्य अवधुतराव मस्के, नगरसेवक अशोक उंटवाल, लक्ष्मणराव वाघमोडे, अ. समद कुरेशी, काळीचे सरपंच गौतम रणवीर, सुनील टेमकर, सै. इरफान, आझाद पटेल, अ. वहाब, सरफराज खान, बिलालभाई, पुसद अर्बन बँकेचे संचालक के.आय. मिर्झा, रहीम ठेकेदार, इरशाद ठेकेदार, अल्पसंख्यक आघाडीचे शहर अध्यक्ष सै. इश्तीयाक, तहसीन खान आदी उपस्थित होते. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सामूहिक विवाह मेळाव्याची गरज विशद केली. काझी सदरोद्दिन यांनी विवाह विधी पार पाडला, तर मुफ्ती शफी यांनी वधु-वरांच्या भावी जीवनासाठी प्रार्थना केली. याप्रसंगी शिक्षक गुलाम, सादिक, सज्जाद मिर्झा, आसिफभाई, अकील, फैज अहमद, मोबीन अहेमद, राजू मेमन, खुद्दसभाई, नायबभाई, आजीमी अहेमद, याकुबभाई, इकबाल ठेकेदार, हशिरभाई, नाजीम राज, साकीब शाह आदी उपस्थित होते. मेळाव्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी, गुलामनबी आझाद शिक्षण संकुलच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)
मुस्लीम समाज सामूहिक विवाह मेळावा
By admin | Updated: May 31, 2015 02:23 IST